Join us

‘लाइफलाइन’चा सोशल कनेक्ट; प्रशासनाबद्दल प्रवाशांमध्ये विश्वास वाढतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 01:09 IST

एक्स्प्रेस, लोकलमधील प्रवासी आपल्या तक्रारी, समस्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे आपली भूमिका चोखरीत्या पार पाडण्यासाठी काम करते.

- कुलदीप घायवट मुंबई : एक्स्प्रेस, लोकलमधील प्रवासी आपल्या तक्रारी, समस्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे आपली भूमिका चोखरीत्या पार पाडण्यासाठी काम करते. सोशल मीडियावर तक्रारीचे निवारण होत असल्याने, प्रशासनाबद्दल प्रवाशांमध्ये विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.एक्स्प्रेसमध्ये स्वच्छता करणे, पंखे, बटण दुरुस्ती करणे, स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविणे, अशा तक्रारी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सोशल मीडियावर प्रवाशांकडून केल्या जातात. ही तक्रार सोशल मीडियाद्वारे संबंधित विभागाला कळविली जाते. त्यानंतर, या तक्रारीचे निवारण केले जाते. त्यामुळे प्रत्येक प्रवासी हा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सोशल मीडियाशी ‘कनेक्ट’ होत आहे.भारतीय रेल्वेमधील सर्व झोनमध्ये पश्चिम रेल्वे अग्रेसरपश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलचा वक्तशीरपणा सर्वाधिक आहे. त्याप्रमाणे, प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीदेखील ‘पश्चिम रेल्वे’ची सोशल मीडिया पुढे आहे. भारतीय रेल्वेमधील १७ झोनपैकी सर्वाधिक फॉलोअर्स पश्चिम रेल्वे झोनचे आहेत. टिष्ट्वटरवर पश्चिम रेल्वेचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. पश्चिम रेल्वेच्या टिष्ट्वटर अकाउंटचे सुमारे २ लाख ७३ हजार १३३ फॉलोअर्स आहेत. त्यानंतर, मध्य रेल्वेच्या टिष्ट्वटर अकाउंटचा क्रमांक लागतो.तक्रारीला जलदगतीने प्रतिसाद देण्यासाठी प्रयत्नप्रवाशांनी मध्य अथवा पश्चिम रेल्वेला टिष्ट्वटरवर टॅग करून एखादी तक्रार, समस्या मांडली असेल, तर त्याला जलदगतीने प्रतिसाद देण्यासाठी प्रयत्न केले जातात. साधारण ५ ते ३० मिनिटांच्या आत प्रतिसाद दिले जातात. पश्चिम रेल्वेच्या टिष्ट्वटर अकाउंटवरून एखादी पोस्ट अपलोड केल्यास, ती पोस्ट एका तासात सुमारे सहा हजारांपर्यंत फॉलोअर्सपर्यंत पोहोचली जाते.कसे सुरू असते काम?: मध्य आणि पश्चिम रेल्वेची सोशल मीडिया २४ तास सुरू असते. मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनातील कर्मचारी, कंट्रोल रूम आणि एका खासगी कंपनीच्याद्वारे टिष्ट्वटर अकाउंट सांभाळले जाते. प्रवाशांच्या तक्रारी आणि असुविधेनुसार दोन्ही प्रशासनाचे टिष्ट्वटर अकाउंट काम करतात. एखाद्या प्रवाशाने स्थानकावरील अस्वच्छता बदल तक्रार केल्यास, ते स्थानक कोणते, नेमक्या कोणत्या ठिकाणी याचा आढावा घेऊन संबंधित विभागाला ती माहिती कळविण्यात येते. त्यानंतर, प्रवाशाच्या तक्रारीचे निर्वारण केले जाते.मध्य रेल्वे दररोज १० ते १४ पोस्ट करते. यात ३ ते ४ फॉरवर्ड करते. कोणती समस्या असेल, तर संबंधित विभागाच्या टिष्ट्वटर अकाउंटला टॅग करून प्रवाशांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करते. मध्य रेल्वेच्या टिष्ट्वटर अकाउंटवरून नोव्हेंबर, २०१९ या महिन्यात २७४ पोस्ट करण्यात आल्या. याच महिन्यात २० लाख २० हजार फॉलोअर्सचे लाइक्स, रिटिष्ट्वट, कमेंट मिळाल्या आहेत. एका तासात एका पोस्टला साधारण सुमारे ६० ते ७० लाइक्स, रिटिष्ट्वट, कमेंट मिळतात. एप्रिल ते नोव्हेंबर, २०१९ या कालावधीत मध्य रेल्वेच्या टिष्ट्वटर अकाउंटवरून ३ हजार ३१५ पोस्ट, रिटिष्ट्वट झाले आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांना रेल्वेच्या नवीन उपक्रमाची माहिती देण्यात येते. यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वेच्या उपक्रमाबाबत जागृती होते. प्लास्टीक बंद, स्वच्छता मोहीम अशा उपक्रमाची माहिती सोशल मीडियाद्वारे सहज पोहोचते. उत्तम रेक, एसी लोकल, रेल्वेच्या प्रकल्पाचे उद्घाटन यांचे फोटो आणि माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचविली जाते.फेसबुक, इन्स्टाग्रामवरदेखील प्रशासन ‘अ‍ॅक्टिव्ह’पश्चिम, मध्य रेल्वे प्रशासन फेसबुक, इन्स्टाग्रामवरदेखील अ‍ॅक्टिव्ह आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर नवीन प्रकल्पाचे फोटो आणि इत्यंभूत माहिती याद्वारे अपलोड केली जाते. उदा. पश्चिम रेल्वे मार्गावरील उत्तम रेक याचे फोटो आणि त्याची माहिती. मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलचे फोटो आणि त्याची माहिती पोस्ट केली जाते.

टॅग्स :पश्चिम रेल्वेमध्य रेल्वे