Join us  

सेल्फीच्या नादात जाणार होता जीव, पण दैव बलवत्तर म्हणून....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 6:58 AM

सेल्फी पॉइंट असलेल्या इको पॉइंटवर फिरण्यासाठी गेले होते.

नेरळ - माथेरानला फिरायला गेल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एका आजोबाचा जीव सुुदैैवाने थोडक्यात बचावला. माथेरानच्या इको पॉइंटवर सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने 58 वर्षीय आजोबा 400 फूट खोल दरीत कोसळले होते.मात्र, दैव बलवत्तर होते म्हणून ते बचावले. दरीत घसरत गेल्यानंतर त्यांना बचाव पथकाने दरीबाहेर काढून वाचवले.अजित प्रभाकर बर्वे (५८) असं त्यांचं नाव असून त्यांना किरकोळ जखम झाली आहे. बर्वे मुंबईतील विलेपार्ले या ठिकाणी राहतात. दोन दिवसांपूर्वी ते माथेरानला फिरायला गेले होते. एका हॉटेलमध्ये राहत होते. सेल्फी पॉइंट असलेल्या इको पॉइंटवर फिरण्यासाठी गेले होते. सुरक्षा कठडे ओलांडून दरी पाहत असताना आणि मोबाइलवर सेल्फी काढत असताना त्यांचा तोल जाऊन ते 400 फूट दरीत कोसळले. ते डोंगराच्या मध्यावर अडकून पडले आणि वाचवा वाचवाअसे ओरडू मदत मागू लागले. हा प्रकार पोलिसांना कळल्यानंंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांना रेस्क्यू टीमच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :पोलिसमाथेरान