विषारी द्रव्य प्राशन करत जोडप्याने संपविले आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 03:19 IST2019-06-08T03:19:42+5:302019-06-08T03:19:50+5:30
दाम्पत्य ४५ ते ५० वयोगटातील आहे. शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका पादचाऱ्याने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बेशुद्धावस्थेत असलेल्या जोडप्याची माहिती दिली.

विषारी द्रव्य प्राशन करत जोडप्याने संपविले आयुष्य
मुंबई : गिरगाव चौपाटीजवळ एका जोडप्याने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस मृत दाम्पत्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.
दाम्पत्य ४५ ते ५० वयोगटातील आहे. शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका पादचाऱ्याने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बेशुद्धावस्थेत असलेल्या जोडप्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच, मरिन ड्राइव्ह पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी दोघांनाही तत्काळ रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांना झुरळ मारण्याच्या औषधाची बाटली सापडली आहे. तेच प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच महिलेकडील बॅगेत पोलिसांना दात घासण्याच्या ब्रशसह जास्तीचे कपडे आढळले असून कुठल्याही स्वरूपाचे ओळखपत्र त्यांच्याकडे मिळालेले नाही.
ही मंडळी बाहेरून प्रवास करून येथे आली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र ते कुठून व कसे आले, याबाबत ते अनभिज्ञ आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्हीतूनही याबाबत काही सुगावा लागत नसल्याची माहिती मरिन ड्राइव्ह पोलिसांनी दिली.