Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिला संघटना धाडणार पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 13:02 IST

या संदर्भात राज्यातील महिला संघटना एकत्र येत पंतप्रधान कार्यालयाला पत्रही पाठविणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशातील प्रथितयश महिला कुस्तीपटूंकडून गंभीर आरोप होत असलेल्या खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी माऊली बहुउद्देशीय महिला संस्थेने केली आहे. या संदर्भात राज्यातील महिला संघटना एकत्र येत पंतप्रधान कार्यालयाला पत्रही पाठविणार आहेत.

कुस्तीपटू महिलांनी खासदार सिंग यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्या कुस्तीपटू महिलांना  दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीचा माऊली बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्ष व राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश सरचिटणीस उषा चौधरी यांनी निषेध केला आहे. चौधरी यांनी महाराष्ट्रातील महिला शिष्टमंडळासमवेत नुकतीच जंतरमंतर येथे जाऊन आंदोलनस्थळी कुस्तीपटू साक्षी मलिक यांची भेट घेतली. या आंदोलनाला महाराष्ट्रातील महिलांतर्फे जाहीर पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

सर्व महिला संघटना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. खेळाडू आणि नागरिकांनी अशी पत्रे पाठवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही केले आहे.

 

टॅग्स :मुंबई