विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीकडून पत्र

By Admin | Updated: May 13, 2015 00:24 IST2015-05-13T00:24:17+5:302015-05-13T00:24:17+5:30

शासनाने मीरा-भार्इंदर महापौरांच्या निर्णयाला निलंबित केल्याचे स्पष्ट केल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी लियाकत शेख यांच्या नावाचे पत्र सोमवारी

Letter from NCP for Leader of Opposition | विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीकडून पत्र

विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीकडून पत्र

भार्इंदर : शासनाने मीरा-भार्इंदर महापौरांच्या निर्णयाला निलंबित केल्याचे स्पष्ट केल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी लियाकत शेख यांच्या नावाचे पत्र सोमवारी (११ मे) राष्ट्रवादीकडून प्रशासनाला देण्यात आले आहे. महापौर गीता जैन यांनी २ मार्च रोजीच्या महासभेत विरोधी पक्षातील सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीला डावलून काँग्रेसच्या प्रमोद सामंत यांच्या विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली होती. महापौरांचा हा निर्णय पालिका अधिनियमाशी विसंगत असल्याने पालिकेने तो राज्य शासनाकडे पाठविला होता.
पालिकेतील यंदाच्या सत्ता परिवर्तनानंतर भाजपा-सेना युती सत्तेत बसली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष असून दुय्यमस्थानी काँग्रेस पक्ष आहे. असे असतानाही महापौर जैन यांनी २ मार्च रोजी पार पडलेल्या महासभेत विरोधी पक्षनेता निवडीच्या वेळी काँग्रेसला झुकते माप देऊन या पक्षाचे प्रमोद सामंत यांची नियुक्ती केल्याचा निर्णय जाहीर केला. या वेळी महापौरांनी या पदासाठी राष्ट्रवादीखेरीज काँग्रेसने पत्र दिल्याचा दावा करीत घेतलेल्या निर्णयाची पाठराखण केली होती. त्याला राष्ट्रवादीने विरोध करीत सभात्याग केला होता.
प्रशासनानेसुद्धा हा निर्णय पालिका अधिनियमातील तरतुदींशी विसंगत असल्याचे स्पष्ट करून २४ मार्च रोजी त्याचा अहवाल राज्य शासनाने पाठविला होता. शासनाने ९ मे रोजी पालिकेला पाठविलेल्या पत्रात महापौरांनी घेतलेला निर्णय निलंबित केल्याचे स्पष्ट करण्यात आले असून महापौरांनी आवश्यकता वाटल्यास त्यावर येत्या ३० दिवसांत शासनाकडे म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. यामुळे काँग्रेसने मिळविलेले विरोधी पक्षनेतेपद दोन महिन्यांतच क्षणभंगुर ठरले आहे. राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदाचे दावेदार लियाकत शेख यांच्या नावाचे पत्र सोमवारी शासनाला दिले असून येत्या महासभेत शेख यांच्या नावाची घोषणा होईल (प्रतिनिधी)

Web Title: Letter from NCP for Leader of Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.