Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचा पॅटर्न  देशातही पुढे नेऊ- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 06:29 IST

राज्यात महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नसून महाविकास आघाडीचा पॅटर्न देशातही पुढे राबविणार आहोत,

मुंबई :

राज्यात महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नसून महाविकास आघाडीचा पॅटर्न देशातही पुढे राबविणार आहोत,  असे मुंबई उपनगरचे  पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. सोमवारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, त्या काय बोलल्यात हे मी  ऐकलेले नाही.

आम्ही केलेली कामे त्यांना दिसतील भाजपाकडून होत असलेल्या नालेसफाईच्या दौऱ्याबाबत ते म्हणाले, काही वर्षे त्यांनी आमच्यासोबत एकत्र काम केले आहे. आता ते बाहेर फिरत आहेत, हे चांगलेच आहे. त्यामुळे निदान आम्ही केलेली कामे त्यांना दिसून  येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेना