इव्हीएम मशिनबाबत न्यायालयात धाव

By Admin | Updated: November 27, 2014 22:32 IST2014-11-27T22:32:49+5:302014-11-27T22:32:49+5:30

नेळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग - सहा मधून राष्ट्रवादीच्या आघाडीमधून धनाजी गरुड यांनी निवडणूक लढविली.

Let the court run the EVM machine | इव्हीएम मशिनबाबत न्यायालयात धाव

इव्हीएम मशिनबाबत न्यायालयात धाव

कर्जत : नेळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग - सहा मधून राष्ट्रवादीच्या आघाडीमधून धनाजी गरुड यांनी निवडणूक लढविली. तेथे त्यांना पराभवाचा झटका बसला असून त्यांनी आता इव्हीएम मशिनमध्ये घोळ झाल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे. त्याचवेळी त्यांनी तक्रार करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.        
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नेरळ अध्यक्ष धनाजी गरुड यांनी राष्ट्रवादी आघाडीच्या प्रभाग - सहामधून निवडणूक लढविली होती. त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असून त्यांनी आपल्या पराभवाला इव्हीएम मशीन कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. इव्हीएम मशिनमधील घोळामुळे आपला पराभव झाल्याचा आरोप करीत तत्काळ इव्हीएम मशिनचे मेमरी कार्ड तपासून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी एका अर्जाद्वारे कर्जत निवडणूक अधिका:यांकडे त्यांनी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रभाग - सहामध्ये असलेल्या तिन्ही मतदान केंद्रांवर ठेवलेल्या मशिनमध्ये आपल्या नावापुढे असलेले टोपली निशाणीचे बटण दाबले जात नसल्याने हा प्रकार अनेक मतदारांनी तेथील मतदान केंद्राध्यक्षांना सांगितला, त्यावर तुम्ही अन्य बटण दाबून बघा, अशी सूचना करण्यात आली. त्यावर अनेकांनी तसा प्रयत्न केला असता, अन्य बटण दाबले जात असल्याने आपली मते इतर उमेदवाराला मिळून आपला पराभव झाला असल्याचा आरोप धनाजी गरु ड यांनी केला आहे. दरम्यान, अनेक मतदारांनी आपले म्हणणो मतदानानंतर घरी येऊन सांगितल्याने तक्र ार करण्याचा निर्णय घेतला आणि इव्हीएम मशिनचे मेमरी कार्ड तपासण्याची मागणी आपण केली आहे. त्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय धनाजी गरुड यांनी घेतला आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Let the court run the EVM machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.