Join us  

मुंबईत पावसामुळे 'लेप्टोस्पायरोसिस' आजाराचा कहर, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 5:01 PM

एका रिपोर्टनुसार, उंदीर आणि इतर जनावरांमधील एका बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजाराने आतापर्यत ४ जणांचा जीव घेतला आहे. तर काही लोकांची स्थिती गंभीर आहे.

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं असून अनेक गंभीर आजारांनीही डोकं वर काढलं आहे. सध्या मुंबईत लेप्टोस्पायरोसिस या आजाराने लोकांना ग्रासले आहे. 

एका रिपोर्टनुसार, उंदीर आणि इतर जनावरांमधील एका बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजाराने आतापर्यत ४ जणांचा जीव घेतला आहे. तर काही लोकांची स्थिती गंभीर आहे. या आजाराची गंभीरता लक्षात घेऊन नियंत्रण विभागाने उंदरांच्या बिळांमध्ये किटकनाशक औषधे टाकण्यास सुरूवात केली आहे. सोबतच लोकांना उंदीर आणि घाण पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. चला जाणून घेऊ काय आहे हा आजार आणि यापासून कसा बचाव करावा.

काय आहे लेप्टोस्पायरोसिस?

हे एक बॅक्टेरिअल इन्फेक्शन असून हे जनावरांपासून होत. हा बॅक्टेरिया श्वान, उंदीर आणि इतर प्राण्यांच्या लघवीतून पसरतो. या गंभीर आजाराचे काही विशेष लक्षणे नाहीत. हा आजार जास्त वाढल्यास जीवाला धोकाही होऊ शकतो. छातीत दुखण्यासोबतच हाता-पायांवर सूज येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. 

कसा पसरतो आजार?

लेप्टोस्पायरोसिस लेप्टोस्पिरा इंटरऑर्गन नावाच्या बॅक्टेरियाने होतो. हा बॅक्टेरिया अनेक जनावरांच्या किडनीमध्ये असतो. त्यांच्या लघवीच्या माध्यमातून तो बाहेत येतो. आपल्या तोंडा, नाका वाटे हा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो. हा आजार शारीरिक संबंधामुळेही पसरू शकतो.

काय आहेत आजाराची लक्षणे?

1) डोकेदुखी२) मांसपेशींमध्ये वेदना३) काविळ४) उल्टी होणे५) लूजमोशन६) त्वचेवर लाल पुरळ येणे

कसा कराल बचाव?

1) दूषित पाण्यापासून दूर रहा

पावसाच्या पाण्यामुळे हा आजार पसरण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यापासून दूर राहणे हा उत्तम उपाय असेल. 

२) उंदीर आणि जनावरांपासून दूर रहा

तुमच्या घराजवळ उंदीर असतील तर त्यांना लगेच तेथून पळवून लावा. घर स्वच्छ ठेवा आणि अन्न पदार्थ उघडे ठेवू नका. 

टॅग्स :आरोग्यमुंबई