Join us

आयआयटी बॉम्बेच्या परिसरात दिसला बिबट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 22:39 IST

सध्या अनेक विद्यार्थी आयआयटी संकुलात नसले तरी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुंबई- लॉकडाऊन काळात आयआयटी बॉम्बेच्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. आयआयटी बॉम्बेच्या एका सुरक्षा रक्षकाला हा बिबट्या दिसला असून, त्याने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, बिबट्या जंगलाच्या झाडीत पुन्हा पळून गेल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. या आधीही आयआयटी बॉम्बेच्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला होता. त्यामुळे सध्या अनेक विद्यार्थी आयआयटी संकुलात नसले तरी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.