Join us
Daily Top 2Weekly Top 5

Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:47 IST

दिंडोशी येथील रहेजा हाइट्स परिसरात आज पहाटे ३:०० ते ४:०० दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबई: दिंडोशी मालाड(पूर्व) येथील रहेजा हाइट्स, डी विंग परिसरात आज पहाटे ३:०० ते ४:०० दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार स्पष्टपणे कैद झाला असून, बिबट्या पार्किंग परिसरात फिरताना दिसत आहे.

गेल्या मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात येथील नागरी निवारा परिषद येथील संकल्प सहनिवास संकुल तसेच रहेजा हाईट्स सोसायटीत भक्ष्य शोधण्यासाठी बिबट्यांचा वावर वाढल्याने या परिसरातील हजारो राहिवाश्यांमध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर येथील रहेजा हाईट्स सोसायटीच्या पार्किंग पोडीयममध्ये येवून चक्क बिबट्या कुत्र्याला पकडून नेत असल्याने नागरिकांची तर रात्रीची झोपच उडाली होती.

वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या वावरामुळे येथील विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात सतर्कतेचे वातावरण असून, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

बिबट्याच्या या परिसरात वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राणी यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आपण मार्च मध्ये येथे बिबट्या आला होता. विधानसभेत आवाज उठवून वनमंत्री गणेश नाईक यांचे लक्ष वेधले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली होती. आता परत येथे बिबट्या येत असल्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत अश्या सूचना आपण आजच वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

- सुनील प्रभू , आमदार 

या घटनेबाबत  संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच या घटनांकडे गांभीर्याने पाहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना कराव्यात.

- विजयकुमार बोरा, स्थानिक रहिवासी, रहेजा हाईटस

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard terrorizes Dindoshi: Residents fear after recent sighting.

Web Summary : A leopard sighting in Dindoshi's Raheja Heights has sparked panic. Residents, already anxious from past incidents, fear for their safety, especially children and the elderly. Authorities are urged to take immediate action.
टॅग्स :बिबट्यामुंबई