Join us

आरेत पुन्हा दिसला बिबट्या; आरे कॉलनीत सातत्याने रेस्क्यू टीमची गस्त वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 06:31 IST

युनिट १५ येथे १६ महिन्यांच्या मुलीवर हल्ला केल्यानंतर वनविभागाने एका बिबट्याला जेरबंद केले होते.

मुंबई : रविवारी आरे कॉलनी युनिट १५ येथे एक नर जातीचा बिबट्या आढळला होता. त्यानंतर पुन्हा त्याच दिवशी आणखी एक मादी जातीचा बिबटा दिसला असल्याचा दावा संजय गांधी नॅशनल पार्क रेस्क्यू टीमसह स्थानिकांनी केला आहे. अलीकडेच एका बिबट्याला सापळा रचून जेरबंद केले. त्यानंतर आरे कॉलनीत सातत्याने रेस्क्यू टीमची गस्त वाढवली आहे. दिवसाही येथे बिबट्या दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

युनिट १५ येथे १६ महिन्यांच्या मुलीवर हल्ला केल्यानंतर वनविभागाने एका बिबट्याला जेरबंद केले होते. त्यानंतर आठवड्याभरात आणखी एक बिबट्या जाळ्यात अडकला. मुलीवर हल्ला केल्याच्या घटनास्थळापासून २०० ते ३०० मीटर अंतरावर हा बिबट्या आढळल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा येथे बिबट्या दिसल्याचे समजते.रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. पण त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास २० ते ३० स्थानिक रहिवाशांनी आणखी एक बिबटा पाहिल्याचे म्हटले आहे. जंगलाच्या दिशेने दिवसभर कुत्रे भुंकत होते. त्यामुळे जंगलात आणखी एक बिबटा असल्याचे नाकारता येत नाही.

गस्त वाढवलीवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही येथील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत आहोत. तसेच परिसरात गस्तही वाढवली आहे. वन विभागाने रेस्क्यू टीमच्या सदस्यांना त्यानुसार निर्देश दिले आहेत. कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण सुरू आहे.

टॅग्स :आरेबिबट्या