तलासरीत पकडला बिबट्याचा बछडा

By Admin | Updated: October 8, 2016 13:31 IST2016-10-08T13:31:06+5:302016-10-08T13:31:06+5:30

पालघर जिल्ह्याच्या तलासरी भागातील र्डी वन क्षेत्रा अंतर्गत आच्छाड येथे एका आदिवासी शेतकऱ्याच्या घरात घुसलेला बिबट्याचा बछडा प्राणी मित्रांनी पकडला.

A leopard caught in Talas | तलासरीत पकडला बिबट्याचा बछडा

तलासरीत पकडला बिबट्याचा बछडा

>सुरेश काटे, ऑनलाइन लोकमत
तलासरी, दि. ८ -  पालघर  जिल्ह्याच्या तलासरी या भागात बिबट्याची दहशत असून बोर्डी वन क्षेत्रा अंतर्गत आच्छाड येथे एका आदिवासी शेतकऱ्याच्या घरात घुसलेला बिबट्याचा बछडा प्राणी मित्रांनी पकडला.
आच्छाड येथील सोन्या ठाकरे याच्या घरात बिबट्याचा बछडा आज सकाळी घुसला व घरातील कोंबडी खाऊन फस्त केली या वेळी आवाज झाला म्हणून सोन्या ठाकरे च्या बायकोने बघितले असता बिबट्या घरात घुसलेला पाचावर धारण बसताच ती आतल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला 
घरात अडकलेला बिबट्याच्या बछडा वन कर्मचारी व डहाणूत प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाळी लाऊन पकडला.

Web Title: A leopard caught in Talas