Join us  

विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:18 AM

विधिमंडळाच्या १७ जूनपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.

मुंबई : विधिमंडळाच्या १७ जूनपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विधानसभेची निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. भाजपच्या कोट्यातील चार तर शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्री पद रिक्त आहे. आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे भाजपकडून किमान चौघांना संधी दिली जावू शकते. ज्यांना विधानसभा निवडणूक लढण्याची पुन्हा संधी दिली जाणार नाही अशा एकदोन मंत्र्यांना वगळण्याचा निर्णयही होऊ शकतो. जूनच्या पहिल्या वा दुसºया आठवड्यात विस्तार होईल.>बक्षीस मिळणार?फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचे गेल्या दोन वर्षांत अनेक मुहूर्त सांगण्यात आले पण विस्तार होऊ शकला नाही. आता चार महिन्यांसाठी का होईना पण मंत्रीपद मिळूृ शकते. अर्थात त्यातील दीड महिना हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेतच जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य देणाऱ्यांपैकी काहींना मंत्रीपदाचे बक्षीस दिले जाऊ शकते.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे