१० स्थानकांवर एलईडी इंडिकेटर कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 05:41 IST2018-10-15T05:41:27+5:302018-10-15T05:41:54+5:30
मध्य रेल्वे; दोन टप्प्यांतर्गत ३५ स्थानकांतील जुनी यंत्रणा बदलण्याचा निर्णय

१० स्थानकांवर एलईडी इंडिकेटर कार्यान्वित
मुंबई : रेल्वे स्थानकांवरील इंडिकेटर धुरकट दिसतात किंवा कधी-कधी बंदच असतात, याचा अनुभव प्रत्येक प्रवाशाने घेतला आहे. मात्र, मध्य रेल्वेने आता दोन टप्प्यांतर्गत एकूण ३५ स्थानकांतील जुने इंडिकेटर बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी सद्यस्थितीत १० स्थानकांतील इंडिकेटर बदलून त्या जागी एलईडी इंडिकेटर बसविण्यात आले आहेत.
मे, २०१८ रोजी पहिल्या टप्प्यांतर्गत १३ स्थानकांमधील जुने इंडिकेटरची पाहणी करण्यात आली. यानुसार, अंबरनाथ, बदलापूर, विठ्ठलवाडी, शेलू, भिवपुरी रोड, शहाड, आंबिवली, टिटवाळा, कसारा आणि डोंबिवली या स्थानकांतील जुने इंटिकेटर बदलून त्या जागी नवे इंडिकेटर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकातील जुने इंडिकेटर डिसेंबर, २०१८पर्यंत बदलण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात २२ रेल्वे स्थानकांतील जुने इंडिकेटर मार्च, २०१९ पर्यंत बदलणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.