‘ऑनलाईन व्यवहारातील फसवणूक, सावधगिरी’ विषयावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:06 IST2021-02-27T04:06:59+5:302021-02-27T04:06:59+5:30
मुंबई : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ ‘फेस्कॉम’च्या वतीने डिजिटल ‘आर्थिक व्यवहाराची प्राथमिक साक्षरता आणि सावधता’ या विषयावर व्याख्यान आयोजित ...

‘ऑनलाईन व्यवहारातील फसवणूक, सावधगिरी’ विषयावर व्याख्यान
मुंबई : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ ‘फेस्कॉम’च्या वतीने डिजिटल ‘आर्थिक व्यवहाराची प्राथमिक साक्षरता आणि सावधता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर हे या विषयावर स्लाईड शोच्या आधारे मार्गदर्शन करणार आहेत. प्रादेशिक विभाग मुंबई आणि कोकण यांच्यातर्फे सोमवार १ मार्च रोजी ४.३० ते ६ या वेळेत हे व्याख्यान पार पडणार आहे. बनावट व फसवे संदेश, ई-मेल, फोन कॉल, एटीएम कार्ड या सर्वांच्या व्यवहारांत अनेकदा नागरिकांना फसविण्यात येते. मुख्यतः ज्येष्ठ नागरिक या फसवणुकीला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. या ऑनलाईन फसवणुकीपासून कोणती सावधगिरी बाळगावी, या संदर्भात या ऑनलाईन व्याख्यानात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे व्याख्यान झूम मीटिंगद्वारे होणार आहे.