विमानतळ बाधितांच्या घरांसाठी उद्या भूखंड सोडत
By Admin | Updated: March 12, 2015 01:05 IST2015-03-12T01:05:59+5:302015-03-12T01:05:59+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ६११ घरांसाठी शुक्रवारी भूखंड सोडत काढण्यात येणार आहे. सिडको भवनात सकाळी

विमानतळ बाधितांच्या घरांसाठी उद्या भूखंड सोडत
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ६११ घरांसाठी शुक्रवारी भूखंड सोडत काढण्यात येणार आहे. सिडको भवनात सकाळी साडेदहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात येईल.
विमानतळासाठी गावठाण आणि बाहेरील जागा संपादित करण्यात येणार आहेत. त्यांचा मोबदला म्हणून पुनर्वसन आणि पुनर्स्थापना योजनेअंतर्गत भूखंड देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत गेल्या महिन्यात काढण्यात आलेल्या सोडतीद्वारे उलवे, तरघर आणि कोंबडभुजेतील ५०३ बांधकामधारकांसाठी भूखंडांचे क्रमांक निश्चित करण्यात आले. शुक्रवारी होणाऱ्या सोडतीत वरचा ओवळा, गणेशपुरी, वाघिवली वाडा, कोपर व कोल्ही या गावांतील ६११ घरांसाठी भूखंड सोडत काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती सुभाष धर्माधिकारी, सिडकोचे माजी मुख्य नियोजनकार दिनकर सामंत, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, समाजसेवक संदीप ठाकूर आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)