Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिस्क्रिप्शनची चिंता आता सोडा, डॉक्टरांना मिळणार सुंदर, वळणदार हस्ताक्षराचे धडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘ डॉक्टरांचे अक्षर देवच वाचू शकतो,’ हा जुना विनोद आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे; ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘डॉक्टरांचे अक्षर देवच वाचू शकतो,’ हा जुना विनोद आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे; कारण रुग्णांना दिले जाणारे औषधांचे प्रिस्क्रिप्शन स्पष्ट, वाचनीय आणि शक्यतो कॅपिटल अक्षरांतच असावे, यासाठी राज्य सरकारने थेट वैद्यकीय अभ्यासक्रमातच याचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डॉक्टरीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचे धडे गिरवावे लागणार आहेत.

धनंजय मुंडे आणि समाधान आवताडे यांनी प्रिस्क्रिप्शनच्या गुणवत्तेवर आणि हस्ताक्षराच्या सुस्पष्टतेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष उपसमित्या स्थापन केल्या आहेत का, असा लेखी प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. सुंदर हस्ताक्षरातील प्रिस्क्रिप्शनचे महत्त्व अभ्यासक्रमातच पटवून दिले जाणार आहे.

समितीही स्थापन करणारराष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनी डिसेंबर २०२५ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांना औषध व उपचार समितीअंतर्गत प्रिस्क्रिप्शन पद्धतीचे परीक्षण व देखरेख करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रिस्क्रिप्शन स्पष्ट आणि वाचनीय हस्ताक्षरात असावे, यासाठी याचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्याबाबतचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचेही निर्देश दिले आहे. या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने २० फेब्रुवारी रोजी त्याबाबतचे पत्र जारी केले आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

डिजिटलचाही पर्यायशासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये ‘नेक्स्ट जेन ई-हॉस्पिटल’ ही अद्ययावत आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली कार्यरत आहे. या प्रणालीमुळे रुग्णांना डिजिटल प्रिस्क्रिप्शन दिले जात असून, औषधांच्या चुकांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे सांगण्यात आले.एकूणच, ‘डॉक्टरांचे अक्षर’ हा विनोद राहू नये, तर रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा बनावा, यासाठी सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांना औषध समजावे, गोंधळ टळावा यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctors to learn legible handwriting for prescriptions in medical curriculum.

Web Summary : Maharashtra includes legible prescription writing in medical curriculum. Committees will ensure clarity. Digital prescriptions reduce errors in hospitals. This ensures patient safety and medication understanding.
टॅग्स :डॉक्टर