गणपतीसाठी चाकरमान्यांकरिता विशेष रेल्वे गाड्या सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:10 AM2020-08-01T01:10:58+5:302020-08-01T01:11:03+5:30

कोकणवासीयांची मागणी : एसटीची सेवा लवकर सुरू करावी

Leave special trains for servants for Ganpati | गणपतीसाठी चाकरमान्यांकरिता विशेष रेल्वे गाड्या सोडा

गणपतीसाठी चाकरमान्यांकरिता विशेष रेल्वे गाड्या सोडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोकणात जाण्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांना कोकण रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या सोडण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी सुमारे ७० मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. गणेश चतुर्थीपूर्वी १४ दिवसांचे विलगीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे ७ आॅगस्टपूर्वी गावाला पोहोचणे आवश्यक आहे. गौरी-गणपती सणास कोकणात जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांची प्रवास व्यवस्था आणि ई-पासबाबत लवकर योग्य निर्णय घ्यावा. एसटीची सेवा लवकर सुरू करावी, अशीही मागणी गणेशभक्तांनी केली.


गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी सरकारकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोकणात जायचे कसे, असा प्रश्न कोकणवासीयांना पडला आहे. कोकणातील मानाच्या गणपती उत्सवावर सध्या कोरोनाचे संकट आहे. गणपती उत्सवाच्या दरम्यान कोरोनाचे नियम पाळण्यात यावेत, यासाठी राज्य सरकार नियमावली तयार करीत आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस असा कोणताही निर्णय झाला नसल्याने कोकणातील चाकरमान्यांना आपल्या घरी गणपतीस जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.


कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-पुणे-सावंतवाडी यादरम्यान विशेष रेल्वे सोडण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने केली आहे. या संघाने केलेल्या मागणीसाठी पाठिंबा मोहीमही राबविली असून, सुमारे ७० गणेश मंडळ आणि सामाजिक संस्थांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.
कोकणातील स्थानिक ग्रामपंचायतीने गाव ठराव केल्याने चाकरमान्यांना गणेश चतुर्थीपूर्वी १४ दिवसांचे विलगीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे ७ आॅगस्टपूर्वी गावाला पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेष रेल्वे आणि एसटी सेवा लवकर सोडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे.

ई-पासचा निर्णय घ्या
च्गणेश चतुर्थीपूर्वी १४ दिवसांचे विलगीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे ७ आॅगस्टपूर्वी गावाला पोहोचणे आवश्यक आहे. गौरी-गणपती सणास कोकणात जाणाºया गणेशभक्त प्रवाशांची प्रवास व्यवस्था आणि ई-पासबाबत लवकर योग्य निर्णय घ्यावा. एसटीची सेवा लवकर सुरू करावी, अशीही मागणी गणेशभक्तांनी केली.

Web Title: Leave special trains for servants for Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.