विमानतळ प्रकल्पबाधितांसाठी भूखंड सोडत

By Admin | Updated: July 25, 2014 23:55 IST2014-07-25T23:55:14+5:302014-07-25T23:55:14+5:30

विमानतळ प्रकल्पबाधितांना साडेबावीस टक्के भूखंड वितरीत करण्याच्या योजनेचा 15 ऑगस्टपासून शुभारंभ करण्यात येणार आहे. दोन टप्प्यातील भूखंड वाटपासाठी सिडकोस 55 संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत.

Leasing of land for airport project | विमानतळ प्रकल्पबाधितांसाठी भूखंड सोडत

विमानतळ प्रकल्पबाधितांसाठी भूखंड सोडत

नवी मुंबई : विमानतळ प्रकल्पबाधितांना साडेबावीस टक्के भूखंड वितरीत करण्याच्या योजनेचा 15 ऑगस्टपासून शुभारंभ करण्यात येणार आहे. दोन टप्प्यातील भूखंड वाटपासाठी सिडकोस 55 संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 671 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. येथील प्रकल्पग्रस्तांना साडेबावीस टक्के विकसित जमीन देण्यात येणार आहे. पुनर्वसनासाठी वसविण्यात येणा:या पुष्पकनगरमध्ये हे भूखंड देण्यात येणार आहेत. भूखंडाची पहिली सोडत 15 ऑगस्टला होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 46 संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. दुस:या टप्प्यासाठी 9 संमतीपत्रे आली आहेत. सदर भूखंड विमानतळाजवळ वाणिज्य कारणासाठी विकसित करण्यात येणा:या भूभागाजवळ आहेत. येथील 12क् मीटर रुंदीची बहुउद्देशीय मार्गिका नियोजित करण्यात आली आहे. या मार्गिकेमधून मेट्रो रेल्वेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. 
संपादनाखालील जमिनीबद्दल नुकसान भरपाईपोटी विकसित भूखंडाचे वाटप होण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्रमांक 1, पनवेल यांच्याकडे विहीत नमुन्यातील संमतीपत्रे सादर करणो आवश्यक आहे. संमतीपत्रे 
सादर केलेल्या भूखंडधारकांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
 
संमतीपत्र सादर करण्यासाठी कालावधी 
भूखंड सोडतीसाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांच्याकडे 23 जुलैर्पयत अर्ज सादर करणा:यांची 15 ऑगस्टला सोडत होणार आहे. 5 ऑगस्टर्पयत अर्ज सादर करणा:यांची 25 ऑगस्टला सोडत काढण्यात येणार आहे. 

 

Web Title: Leasing of land for airport project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.