Join us  

जाणून घ्या! मुंबईतील वाहतुकीचे अपडेटस, खार सबवे वाहतुकीसाठी खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 12:19 PM

मुंबईत पावसाचा जोर ओसरला असला तरी, अजूनही रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. 

मुंबई, दि. 20 - मुंबईत पावसाचा जोर ओसरला असला तरी, अजूनही रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. 

- खार सबवे वाहतुकीसाठी खुला झाला आहे. 

- बांद्रा रेल्वे कॉलनी आणि गोरेगाव एसव्ही रोडवर पाणी साचल्याने लिकिंग रोडवर वाहतूक वळवण्यात आली आहे. 

- सांताक्रूझ, चेंबर लिंक रोडवर गोगलगायीच्या गतीने वाहतूक सुरु होती. 

- मिलन सबवे खुला झाला असला तरी, अजूनही साचलेले पाणी ओसरलेले नाही. 

- ताडदेव, काळबादेवी भागात वाहतूक सामान्य आहे.कुठेही पाणी साचलेले नाही. 

- खेरवाडी ब्रीचवर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. 

- मालाड येथेही वाहतूक मंद गतीने सुरु आहे. बीकेसीवर कुठेही पाणी साचले नसल्याने परिस्थिती सामान्य आहे. 

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकार