...अखेर गळती थांबली

By Admin | Updated: April 24, 2015 22:40 IST2015-04-24T22:40:23+5:302015-04-24T22:40:23+5:30

गेल्या आठ महिन्यांपासून मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे उड्डाणपुलाखालील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली होती.

The leak finally stopped | ...अखेर गळती थांबली

...अखेर गळती थांबली

तळोजा : गेल्या आठ महिन्यांपासून मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे उड्डाणपुलाखालील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली होती. या जलवाहिनीतून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात होते, मात्र लोकमतने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उप विभागीय अभियंता एस. दशवरे यांनी मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि गळती थांबविली. या वेळी पाच ते सहा ठिकाणी असलेल्या गळतीची दुरुस्ती करण्यात आली.
आठ महिन्यांपासून सुरू असलेली पाण्याची गळती थांबल्याने, परिसरातील नागरिकांना आता पुरेसे पाणी मिळणार आहे. (वार्ताहर)

Web Title: The leak finally stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.