नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात महिला आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 02:16 AM2021-02-09T02:16:18+5:302021-02-09T02:16:26+5:30

नसबंदीच्या उपक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त पुढाकार घेतला असून फक्त २ हजार ७४० पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. तर, यापैकी एकाही पुरुषाच्या नसबंदीची शस्त्रक्रिया अयशस्वी झालेली नसल्याचे पालिकेने सांगितले.

Leading women in sterilization surgery | नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात महिला आघाडीवर

नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात महिला आघाडीवर

googlenewsNext

मुंबई : मागील दोन वर्षांत नसबंदी शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाले आहे, पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नसंबदी शस्त्रक्रिया करण्यात महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून आले आहे. 

२०१९ आणि २०२० या दोन वर्षांमध्ये १७ हजार ६५९ महिलांनी, तर ११६ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्या आहेत. २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत ९७ हजार ६६८ महिलांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतल्या असून, आतापर्यंत त्यातील फक्त ४५ महिलांची नसबंदीची शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर, नसबंदीच्या या उपक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त पुढाकार घेतला असून फक्त २ हजार ७४० पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. तर, यापैकी एकाही पुरुषाच्या नसबंदीची शस्त्रक्रिया अयशस्वी झालेली नसल्याचे पालिकेने सांगितले.

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, मागील दोन वर्षांत नसबंदी शस्त्रक्रिया कमी झाल्या आहेत. याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनानंतर आता संपूर्णतः रुग्णाची काळजी घेऊन या शस्त्रक्रिया नियमित होण्यासाठीही पालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत, नसबंदीची इच्छा असणाऱ्यांनी पालिकेच्या रुग्णालयात जाऊन करून घ्यावी, तिथे त्यांना मार्गदर्शन केले जाईल. 

आकडेवारी
वर्ष     महिला    पुरुष     एकूण नसबंदी
२०१५/१६    १९२५४    ८००    २००५४
२०१६/१७    २०७४२    ७२९    २१४६७
२०१७/१८    २०७५०    ९१४    २१६६४
२०१८/१९    १९२६३    १८५    १९४४८

महिलांच्या अयशस्वी झालेल्या शस्त्रक्रिया
२०१५ -१६     ११
२०१६-१७     ०८ 
२०१७-१८    ११
२०१८-१९     ११

Web Title: Leading women in sterilization surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.