लीड...व्यंग अर्भकाचा जन्म कायदेशीररित्या रोखणे शक्य
By Admin | Updated: November 1, 2014 23:14 IST2014-11-01T23:14:28+5:302014-11-01T23:14:28+5:30
हॅलो लीड....

लीड...व्यंग अर्भकाचा जन्म कायदेशीररित्या रोखणे शक्य
ह लो लीड......................................व्यंग अर्भकाचा जन्म कायदेशीररित्या रोखणे शक्य मुंबईतील तज्ज्ञांकडून मसुद्याचे स्वागत पूजा दामले : मुंबईव्यंग अर्भकाचे पोषण करणे हे कुटुंबासाठी आयुष्यभराचे दिव्य ठरते. त्यात गर्भातच अर्भकाला व्यंग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही गर्भपात करणे सहजशक्य नाही. कारण आपला कायदा केवळ २० आठवड्यांपर्यंतच्या गर्भापातास परवानगी देतो. पण आता ही मर्यादा तब्बल ४ आठवड्यांनी वाढवून २४ आठवड्यांपर्यंत करण्याचा मुसदा केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडाळाने तयार केला आहे. याने देशभरातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार असून याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही स्वागत केले आहे.अर्भक व्यंग होण्याचे प्रमाण जगभरात ३ टक्के आहे. त्यातही आपल्याकडे हे प्रमाण अत्यंत कमी आहे. असे असले तरी व्यंगासह जन्माला येणार्या अर्भकाला भविष्यात होणारा त्रास हा त्या कुटुंबासह सामाजिकदृृष्ट्या देखील चिंतेचाच विषय असतो. यावर तोडगा म्हणजे गर्भातील अर्भकाची शारीरिक रचना जाणून घेतल्यानंतर ते कुटुंब पुढील निर्णय घेऊ शकते. त्यातही एखाद्या कुटुंबाने गर्भपाताचा निर्णय घेतल्यास त्याला कायद्याने घातलेल्या २० आठवड्यांची मुदत आडवी येते. त्यामुळे त्या कुटुंबाला गर्भपात करता येत नाही. याने व्यंग अर्भक जन्माला येण्याची शक्यता बळावते. पुढे त्या अर्भकास त्याच्या कुटुंबालाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत २० आठवड्यांची मर्यादा वाढवणे आवश्यकच होते. काही देशांमध्ये तर ही मर्यादा २८ आठवड्यांपर्यंत आहे.सध्या १९७१ चा गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार, व्यंग किंवा जीवाला धोका असलेल्या गर्भाचा गर्भपात करण्यासाठी २० आठवड्यापर्यंतची मुदत आहे. मात्र २० आठवड्यापर्यंत गर्भाची वाढ परिपूर्ण झालेली नसते. २० आठवड्यापर्यंत गर्भाचे हृदय, मेंदू हे अवयवांची वाढ ही प्राथमिक स्वरूपाची झालेली असते. २० आठवड्यांपासून २४ आठवड्यांपर्यंत गर्भाची जी वाढ होते, त्यात प्रामुख्याने हृदय आणि मेंदूमध्ये व्यंग असल्यास त्याचे निदान करता येते. या काळात गर्भाचा आकार वाढतो, त्यामुळेही त्याच्या तपासण्या करून व्यंग शोधण्यास सोपे जाते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. यामुळेच गर्भपाताची मुदत २० आठवड्यांऐवजी २४ आठवडे केल्यास त्याचा नक्कीच फायदा होणार असल्यामुळे डॉक्टरांनी त्याचे स्वागत केले आहे.गर्भधारणा झाल्यापासून पहिल्या ३ ते ४ महिन्यांमध्ये गर्भाची वाढ होत असते. मात्र या वाढीमध्ये त्याचा आकार लहान असतो. यामुळे तपासण्यांमध्ये काही भाग हे नीट दिसत नाहीत, यामुळेच त्यांच्यात व्यंग आहे की नाही हे सांगता येत नाही. मात्र २४ आठवड्यांपर्यंत बाळाची वाढ झालेली असते, यामुळे त्याच्यात व्यंग असल्यास गर्भपात करता येऊ शकतो. मात्र यामध्ये आईच्या जीवाला धोका संभावण्याचा धोका असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...............................(तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतिक्रिया.....चौकट)काही अर्भकांना असणारे व्यंग हे त्यांच्या जीवाला धोकादायक असते. अर्भक ३ ते ४ आठवड्यांचे होईपर्यंत त्याच्या हृदयात किंवा मेंदूमध्ये असणार्या व्यंगाचे निदान करता येत नाही. काही वेळा अर्भकाला आठव्या, दहाव्या आठवड्यामध्ये संसर्ग होतो. मात्र त्याचे परिणाम हे १२ आठवड्यानंतर दिसतात. अशावेळी गर्भपातासाठी २० आठवड्यापर्यंतचीच मुदत असल्यामुळे गर्भपात करता येणे शक्य होत नाही. आता ही मुदत २४ आठवड्यांपर्यंत वाढवल्यास कायदेशीररित्या गर्भपात करता येऊ शकणार आहे. जसजसे आठवडे वाढतात, त्याप्रमाणे अर्भकाची आकार वाढतो. यामुळे या स्थितीत गर्भपात करताना त्याच्या आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे खरे आहे. औषध आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते, असे मुंबई ऑबस्ट्रेक्टस् ॲण्ड गायनॉकोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अमित पत्की यांनी सांगितले.............................(चौकट)निर्णयाचा फायदाच होणार१३ ते २० आठवड्यांमध्ये गर्भपात करायचा असल्यास त्याला सेकंड टर्मिनेशन असे म्हटले जाते. मात्र २० आठवड्यानंतर गर्भपात करण्यास कायदेशीर परवानगी नाही. तरीही काही वेळा २० आठवड्यानंतर महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास आई आणि बाळाचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने गर्भपाताचा निर्णय घेतला जातो. आता कायदेशीररित्या २४ आठवड्यापर्यंत गर्भपात करणे शक्य झाल्यास याचा नक्कीच फायदा होईल. जेव्हा गर्भाची २ डी तपासणी करण्यात येते, तेव्हा अर्भकाचा आकार लहान असल्यास नीट दिसत नाही. मात्र, अर्भकाची वाढ झाल्यास व्यंगाचे स्वरूप स्पष्ट दिसून येते, असे सायन रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले. ............................................(चौकट)स्त्रियांसाठी घातक निर्णयस्त्रियांसाठी गर्भपात हा आरोग्य हक्क असावा, मात्र २४ आठवड्यांपर्यंत गर्भपाताला मुदत देणे हे स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. गरोदर स्त्रियांना केवळ १२ आठवड्यापर्यंत गर्भपात करायचा असल्यास त्यावेळी तिच्या आरोग्याला धोका संभावण्याची शक्यता निर्माण होते, तर २४ आठवडे यात गरोदर स्त्री आणि अर्भक दोघांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा निर्णय केवळ एकतर्फी घेण्यात आला असून यातून वैद्यकीय क्षेत्राला चुकीचे वळण लागण्याची शक्यता आहे. या मसुद्याला सर्व महिला बचत गट आणि आक्रमक स्त्री संघटनांचा तीव्र विरोध असून वेळप्रसंगी याला आम्ही न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान देऊ...-ॲड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या.........................(चौकट)हायकोर्टातून सुरू झाला प्रवास...२००८ मध्ये एका महिलेला २० आठवड्यांनंतर गर्भपातासाठी परवानगी द्यावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. २० आठवड्यानंतर त्या महिलेला गर्भामध्ये व्यंग असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तिला गर्भपात करायचा होता. मात्र, कायद्याच्या चौकटीत केवळ २० आठवड्यांपर्यंतच गर्भपातास परवानगी असल्याने त्यांनी यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले होते. कारण, परदेशात २२ ते २८ आठवड्यांपर्यंत परवानगी आहे. तेव्हा व्यंग अर्भक जन्माला येण्यापेक्षा गर्भपातास परवानगी द्यावी, असे त्या महिलेचे म्हणणे होते. त्यावेळी त्यांनी मूलभूत अधिकाराचा मुद्दाही उपस्थित केला होता. त्यामुळे या प्रकरणात न्यायलय काय आदेश देणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. मात्र, न्यायालयाने कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन २० आठवड्यांवरील गर्भपातास नकार दिला. पण, अखेर त्या अर्भकाचे निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळाने २० आठवड्यांची गर्भपाताची मुदत २४ आठवडे केल्यास निश्चितच व्यंग अर्भकाचा जन्म कायदेशीररित्या रोखणे शक्य होऊ शकते. ..........................................(चौकट)जगभरातील आकडेवारी काय सांगते...जगभरामध्ये साधारणत: ३ टक्के बालकांना जन्मजात व्यंग असते. या व्यंगांध्ये अनेक प्रकार आहेत. ३ टक्के बालकांपैकी १ टक्के बालकांच्या जीवाला व्यंगामुळे धोका असतो. मात्र उर्वरित बालके ही व्यंग असूनही चांगले आयुष्य जगू शकतात.