गिरणगावाने ठेवला आदर्शाचा थर..

By Admin | Updated: August 19, 2014 02:15 IST2014-08-19T02:15:26+5:302014-08-19T02:15:26+5:30

मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा जपणा:या गिरणगावाने गोकुळाष्टमी दिवशीही परंपरा कायम राखली.

The layer of idealized model was laid in Girnagav .. | गिरणगावाने ठेवला आदर्शाचा थर..

गिरणगावाने ठेवला आदर्शाचा थर..

मुंबई : मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा जपणा:या गिरणगावाने गोकुळाष्टमी दिवशीही परंपरा कायम राखली. सोमवारी दहीहंडी उत्सव साजरा करताना येथील आयोजकांनी राज्य बालहक्क आयोगासह स्थगिती दिलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही मान राखल्याचे निदर्शनास आले. मुंबईसह ठाण्यातली पथके आणि आयोजकांपुढे गिरणगावाने आदर्शाचा थर लावल्याचीच चर्चा दिवसभर होती. 
भायखळा, माझगाव, लालबाग आणि परळ परिसरात आज मोठय़ा उत्साहात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्वच आयोजकांनी सलामी देण्यास येणा:या गोविंदा पथकांना 12 वर्षाखालील एक्क्याला थरावर चढवू नये, असे आवाहन करण्यात येत होते. शिवाय, बहुतांश आयोजकांनी गेल्या वेळच्या तुलनेत थरांच्या मर्यादेला र्निबध लादत परंपरेनुसार हंडी फोडण्याचे आयोजन केले होते.
‘गोविंदाच आमचे सेलिब्रिटी’
भायखळ्यातील दगडी चाळ परिसरात गेल्या 4क् वर्षापासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणा:या अखिल भारतीय सेनेने कमाल सहा थरांची मर्यादा घालून दिली होती. सहा थर व त्याहून कमी थर लावणा:या पथकांना समसमान बक्षिसे देण्यात येत होती. सेलिब्रिटींना बगल देत आयोजकांनी ‘गोविंदा हेच आमचे सेलिब्रिटी’ अशा स्पष्ट शब्दांत आपले विचार आयोजनस्थळी लावलेल्या बॅनरमधून व्यक्त केले. सुरक्षेच्या बाबतीत एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक आयोजनस्थळी उपस्थित होते. प्रत्येक गोविंदाला अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. 
 
1गोविंदा सणाला जसा कॉर्पोरेट लूक आला आहे, तितकाच पथकातील गोविंदाही फॅशनेबल झाला आहे. दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी येणा:या गोपिकांवर स्वत:ची छाप पाडण्यासाठी गोविंदांनी वेगवेगळ्या फॅशनचा आधार घेतल्याचे दिसले. 
2काही पथकांतील गोविंदांनी आकर्षक पद्धतीने केस कापत वेगळे दिसण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी दाढीवर कोरीव काम करून वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला होता. हातावर आणि मानेवर टॅटू काढलेले गोविंदा भलतेच भाव खाऊन जात होते.
3पायाच्या किंवा हाताच्या सांध्यामध्ये त्रस जाणवू नये, म्हणून वापरण्यात येणारे ‘निकॅप’ बहुतेक गोविंदांनी केवळ लोकांचे लक्ष वेधण्यासाठी घातल्याचे कळले. कुरळ्या केसांचे विग घालून ट्रक किंवा टेम्पोच्या छतावर हुल्लडबाजी करणारे गोविंदाही सर्वाचेच लक्ष वेधत होते.
 
5क् वर्षाचा गोविंदा!
एकीकडे राज्य आयोग, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात गोविंदाच्या वयावरून वाद सुरू असताना सुंदर गल्लीतील हनुमानप्रसाद सेवा मंडळाने वेगळाच आदर्श समोर आणला. मंडळाची मानाची हंडी फोडण्याचा मान पथकाने 5क् वर्षे वय असलेल्या अशोक मुंडणकर या गोविंदाला दिला. गेल्या 3क् वर्षाहून अधिक काळापासून गोविंदात सामील होणा:या मुंडणकर यांना प्रथमच हंडी फोडण्यास मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. उत्साहाच्या भरात तिस:या थरावर चढलेल्या मुंडणकर यांनीही डोक्याने हंडी फोडत गोकुळाष्टमीच्या दह्याचा प्रसाद चाखला.
 
फुटली नशामुक्तीची हंडी
वरळीतील संकल्प प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या उत्सवात राज्याच्या नशामुक्ती मंडळाने नशामुक्तीची हंडी फोडत जनजागृती केली. दुपारी साडेबारा वाजता जांबोरी मैदानावर नशामुक्ती मंडळाच्या कार्यकत्र्यानी हजारो गोविंदांसमोर दारूबंदीविरोधातील कोळी नृत्यावर आधारित गाणो सादर केले. या वेळी जमलेल्या हजारो गोविंदांनीही गाण्यावर नृत्य सादर करत मंडळाच्या गाण्याला साथ दिली. त्यानंतर, मंडळाने सादर केलेल्या भारुडाच्या माध्यमातून नशेची हंडी फोडून समाजाला नशामुक्त करण्याचे आवाहन केले.
 
दादरमध्ये ‘रोप वे’चा आधार
1दहीहंडी उत्सव सुरक्षितरीत्या साजरा होण्याच्या दृष्टिकोनातून यंदा दादरच्या उत्सवात गिर्यारोहकांच्या मदतीने रोप वे आधार घेण्यात आला. या आयोजनात सकाळपासून हजेरी लावणा:या गोविंदा पथकांनी रोप वे आधार घेऊन वरच्या थरांवर असणा:या एक्क्यांना सुरक्षेचे कवच दिले. दादरच्या या आयोजनात 4क् ते 5क् गोविंदा पथकांनी रोप वे आधार घेतला.
2यंदा काही गिर्यारोहकांनी पुढाकार घेऊन या रोप वे पद्धतीबद्दल गोविंदा पथकांमध्ये जनजागृती करण्याचे ठरविले. त्याप्रमाणो काही गोविंदा पथकांची भेट घेऊन त्यांना याची प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून भविष्यात सर्व आयोजकांनी रोप वे आधार घेत दहीहंडी आयोजन कराव़े 
3ही संकल्पना सर्वार्पयत पोहोचविण्यासाठी गिर्यारोहक अरुण सावंत यांच्या चमूने दादर येथे हा प्रयत्न यशस्वी करून वेगळा आदर्श घालून दिला. दादर येथे 12-15 गिर्यारोहकांच्या चमूने गोविंदा पथकांना रोप वे पद्धतीसाठी मदत केली. या पद्धतीत एकाच वेळी तीन ते चार गोविंदांना वेगवेगळ्य़ा रोपच्या साहाय्याने सुरक्षा देण्यात येते. 
 
सिद्धार्थ जाधवचे आवाहन
फेरबंदरमध्ये शिवसेना शाखा क्रमांक 2क्2 च्या वतीने आयोजित उत्सवात अभिनेता सिद्धार्थ जाधवने हजेरी लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. उत्सवाचा जल्लोष वाढवणा:या सेलिब्रिटींनी ज्या आयोजकांनी गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेतली असेल, अशाच ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. शिवाय, वयाच्या मर्यादेचे पालन सर्वानीच करायला हवे, असेही तो म्हणाला.
 
पारंपरिक नृत्याची अट
गेल्या 19 वर्षापासून काळाचौकी परिसरात दहीहंडीचे आयोजन करणा:या सुभाष मैदान वेल्फेअर अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टने पथकांना थर रचण्याआधी पारंपरिक नृत्य सादर करण्याची अट घातली होती. शिवाय, 2क् फुटांवर हंडी बांधत कमाल 5 थरांची मर्यादा घातली होती. 5 थरांहून कमी थर लावणा:या पथकांसही तितकेच पारितोषिक देण्यात येत होते.
 
लोकसंगीताची ङिांग
सुंदर गल्लीतील प्रगती प्रतिष्ठानने आयोजन केलेल्या ठिकाणी गोविंदांना हेल्मेट पुरवण्यात येत होते. शिवाय, हंडी लावण्याच्या ठिकाणी रस्त्यावर कार्पेट टाकण्यात आले होते. उत्साह वाढवण्यासाठी लोकसंगीताचे आयोजन करण्यात आले होते.
 
गोविंदा पथके वडापाववरच
मुंबई : दहीहंडी उत्सव वादाच्या भोव:यात अडकल्याने ऐन उत्सवापूर्वीच राजकारणातील बडय़ा आयोजकांनी उत्सवातून माघार घेतली. त्यामुळे प्रायोजक मिळवण्यासाठी गोविंदा पथकांना धावाधाव करायला लागली. मात्र काही पथकांना अखेर्पयत प्रायोजकच न मिळाल्यामुळे गेल्या वर्षीचे टी-शर्ट्स घालून आणि नाश्ता म्हणून मुंबईकरांचे आवडते खाद्य असणा:या वडापाववरच भागवून घेत या गोविंदां पथकांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. 
दहीहंडीच्या उत्सवाच्या दिवशी पथकांची ओळख असलेल्या टी-शर्ट्ससाठी यंदा मात्र गोविंदांना तडजोड करावी लागली. आयत्या वेळी राजकारण्यांनी ‘डच्चू’ मिळाल्यामुळे प्रायोजक आणणार कुठून, हा यक्षप्रश्न पथकांना भेडसावत होता. मात्र गोविंदांचा उत्साह कायम राहावा म्हणून पथकप्रमुखांनी गेल्याच वर्षाचे टी-शर्ट्स घालून उत्सव साजरा केला; मात्र सामान्य गोविंदांनी यावर नाराजी व्यक्त केली. 
 
च्आयोजक प्रकाश सुव्रे यांनी यंदाची दहीहंडी माळीणच्या पीडितांना अर्पण केली. मनसेने कांदिवली पूर्व, दहिसर अशोकवन, बोरिवली मोक्ष प्लाझा येथे दहीहंडी बांधली होती. कांदिवली पूर्व येथे अॅड. अखिलेश चोैबे यांनी 5 लाख 55 हजार 555 रूपयांची दहीहंडी ठाकूर कॉम्पलेक्समध्ये बांधली होती. दहिसर अशोकवन येथे नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्या 3 लाखांच्या दहीहंडीला सचिन खेडेकर, गिरीष ओक, स्वप्नील जोशी,  निशा परूळेकर या दिग्गज मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. दहिसर येथे घोसाळकरांनी साध्या पद्धतीने  दहीहंडी साजरी केली.  

 

Web Title: The layer of idealized model was laid in Girnagav ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.