मुंबई : कायदा गाढव आहे. सगळे वकील हे फसविणारे, लबाड असतात. मग न्यायाधीश हे या सर्वांवर औषध आहे का, असा धक्कादायक प्रश्न चक्क मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधि महाविद्यालयाच्या पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. कायद्याची बाजू मांडणाऱ्यांविषयी असे प्रश्न उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मुंबईच्या शासकीय विधि महाविद्यालयात १६ मार्चला एलएलबीची पदवी घेणाऱ्या तिसºया आणि पाचव्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची ड्राफ्टिंग विषयाची परीक्षा घेण्यात आली. त्यात विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे वकीलही चक्रावले आहेत. कायद्याचे शिक्षण देणारेच असे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करत असतील, तर ते या व्यवसायाकडे उत्तम पर्याय म्हणून कसे पाहू शकतील, असा प्रश्न स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी उपस्थित केला.कायद्याच्या यंत्रणेबाबत नकारात्मक दृष्टिकोनातून शिकवले जाणे ही बाब चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. विधि महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा केवले यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.चौकशी समिती स्थापन करापरीक्षेत असे आक्षेपार्ह प्रश्न कुणी विचारले? त्याला परवानगी कशी मिळाली, यावर चौकशी समिती स्थापन करावी व जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी स्टुडंट लॉ असोसिएशनने केली आहे. तसे पत्र कुलगुरू, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विधि महाविद्यालयाचे प्राचार्य आणि बार कौन्सिल आॅफ इंडियाला त्यांनी लिहिले आहे.चक्रावणारे आणखी प्रश्नवकिली व्यवसायात नव्याने येणाºया मुलांचे शोषण केले जाते. हे त्या मुलांना माहिती असूनही ते या व्यवसायाकडे का वळतात?धार्मिक विश्वास आणि पद्धती या तुम्हाला नरकात घेऊन जातात याचे साधकबाधक उत्तर देऊन कारणे द्या.
कायदा गाढव, सगळे वकील लबाड, मग न्यायाधीश सर्वांवर औषध आहे का? पदवी परीक्षेत अजब प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 05:05 IST