Join us
Daily Top 2Weekly Top 5

लतादीदींची प्रकृती स्थिर, तूर्त आयसीयूमध्येच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 07:10 IST

लतादीदींना कोरोनाची लागण झाल्याने सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचीही लक्षणे दिसून आली होती.

मुंबई : गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना आणखी काही दिवस अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल, अशी माहिती ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत सामधानी यांनी दिली. लतादीदींना कोरोनाची लागण झाल्याने सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचीही लक्षणे दिसून आली होती. वयोमान आणि इतर शारीरिक व्याधींमुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :लता मंगेशकर