तीन वर्र्षांत भार्इंदरचे बदलले चार आयुक्त

By Admin | Updated: February 20, 2015 23:09 IST2015-02-20T23:09:04+5:302015-02-20T23:09:04+5:30

मीरा-भार्इंदर पालिकेच्या आयुक्तपदी नागपुर पालिकेचे उपायुक्त अच्युत हांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत पालिकेतील चार आयुक्त बदलले आहेत.

In the last three years, the four commissions of the Bharindar changed | तीन वर्र्षांत भार्इंदरचे बदलले चार आयुक्त

तीन वर्र्षांत भार्इंदरचे बदलले चार आयुक्त

राजू काळे ल्ल भाईंदर
मीरा-भार्इंदर पालिकेच्या आयुक्तपदी नागपुर पालिकेचे उपायुक्त अच्युत हांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत पालिकेतील चार आयुक्त बदलले आहेत.
राज्य शासनाने मीरा-भार्इंदर पालिकेला जणुकाही आयुक्तांचे प्रशिक्षण केंद्रच बनविल्याची चर्चा चौथ्या आयुक्तांच्या नियुक्तीमुळे शहरभर सुरु झाली आहे. ‘ड’ वर्गातील या महापालिकेच्या इतिहासात गेली अनेक वर्षे मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पालिकेचा कारभार चालविण्यात येत होता.
दरम्यान पालिकेचा विकास झपाट्याने होत नसल्याचे कारण पुढे करुन शासनाने राजकीय मागणीनुसार प्रशासकीय (सनदी) सेवेतील अधिकाऱ्यांंची वर्णी लावण्यास सुरुवात केली. यावर मुख्याधिकाऱ्यांच्या लॉबीला डावलल्याचा आरोप होऊ लागल्याने शासनाने पुन्हा मुख्याधिकारी दर्जाचे अधिकारी आयुक्तपदी नियुक्त करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा राजकीय मागणीनुसार सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार अरोरा या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची आयुक्तपदावर नियुक्ती केली गेली.
विक्रमकुमार यांच्या कारभारातील पारदर्शक शिस्तीला वैतागून शेवटी राजकीय मंडळींसह बिल्डर लॉबीने त्यांची उचलबांगडी घडवून आणली. त्यानंतर २०१३ मध्ये महसूल विभागातील प्रशासकीय सेवेत बढती मिळालेले सुरेश काकाणी यांची आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली. त्यांना वर्ष होत नाही तोवर २०१४ मध्ये राजकीय मंडळींच्याच तक्रारींमुळे त्यांची बदली करण्यात आली.
तद्नंतर माजी मंत्री जयंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक सुभाष लाखे यांची २३ जुलै २०१४ रोजी आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली. लाखे यांना जेमतेम सहा महिने होत नाही तोवर शासनाने १८ फेब्रुवारी २०१५ रोजी लाखे यांची उचलबांगडी करुन त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे उपायुक्त अच्युत हांगे यांची नियुक्ती केली आहे.
विकासात अडथळा
४हांगे यांनी यापूर्वी भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्तपदभारही सांभाळला आहे. गेल्या तीन वर्षांत शासनाने पालिकेतील चार आयुक्त बदलले असून शासनाच्या या बदली सत्रामुळे शहराच्या विकासात खंड पडत असल्याची तीव्र भावना पालिकेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
४शासनाने मीरा-भार्इंदर पालिकेला आयुक्तांचे प्रशिक्षण केंद्रच बनविल्याची चर्चा आयुक्तांच्या नियुक्तीमुळे सुरु आहे. मनपाच्या इतिहासात अनेक वर्षे मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडूनच कारभार चालविला जातो आहे.

 

Web Title: In the last three years, the four commissions of the Bharindar changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.