मुंबई : गेल्या चोवीस तासात मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, उमेदवारांना पक्षाकडून गुप्तता बाळून अधिकृत उमेदवारी अर्ज (एबी फॉर्म) देण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे बहुतांश जण उमेदवारी अर्ज भरणार असल्याने, निवडणूक कर्मचाऱ्यांची खरी कसोटी लागणार आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ठरलेल्या उमेदवारांना सोमवारी एबी फॉर्म दिले, तर ज्या भागात बंडखोरीची शक्यता आहे, अशा प्रभागांमध्ये शेवटच्या क्षणी अर्ज देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे मंगळवारी सगळ्याच पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर निवडणूक केंद्रांवर जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यांना नियंत्रणात ठेवणे जिकिरीचे होणार आहे.
तिकीट नाकारलेले काही बंडखोर शक्तिप्रदर्शन करत अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज आणि त्यासोबत मालमत्तेचे आणि दाखल गुन्हे याबाबतची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र जोडावे लागते. तसेच उमेदवारी शुल्क आणि अनामत रक्कम भरावी लागते.
१०-१५ मिनिटे कालावधी -लागत असल्याने कर्मचाऱ्यांची दमछाक होणार आहे. आलेल्या अर्जांची छाननी २ जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
Web Summary : Mumbai sees political rush as AB forms are distributed. High volume of applications expected. Deadline today. Rebellions possible. Election staff will be tested by the application process.
Web Summary : मुंबई में राजनीतिक आपाधापी, एबी फॉर्म वितरित। आवेदनों की उच्च मात्रा अपेक्षित। आज अंतिम तिथि। विद्रोह संभव। आवेदन प्रक्रिया से चुनाव कर्मचारियों की परीक्षा होगी।