मोहन पाटील यांना अखेरचा सलाम

By Admin | Updated: July 24, 2014 23:46 IST2014-07-24T23:46:28+5:302014-07-24T23:46:28+5:30

शेकापचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री भाई मोहन पाटील यांचे आज सकाळी 8.क्क् वाजता निधन झाले.

The last greetings to Mohan Patil | मोहन पाटील यांना अखेरचा सलाम

मोहन पाटील यांना अखेरचा सलाम

बोरी : सेलू व जिंतूर तालुक्यातील चौदा गावे गारपीट अनुदानापासून वंचित राहिले आहेत. सदरील गावातील पिकांच्या नुकसानीची पाहणीचा अहवाल संंबंधित अधिकाऱ्यांनी करून शासनाकडे चुकीची माहिती दिल्यामुळे ही गावे अनुदानापासून वंचित राहिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सेलू तालुक्यातील आडगाव दराडे, चिमणगाव, भांगापूर, कऱ्हाड, हट्टा, तांदूळवाडी, गव्हा तसेच जिंतूर तालुक्यातील धानोरा, देवगाव, रिडज, चांदज, रेपा, साकळेवाडी, ताटपूर आदी गावामध्ये फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. प्रशासनाने या नुकसानीचे चुकीचे पंचनामे केल्यामुळे गावातील शेतकरी नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहिले आहे.
आजघडीला जवळपासच्या अनेक गावांना पीक नुकसानीचे अनुदान मिळाले आहे. परंतु या गावाला अद्यापही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गोपीनाथ सोळंके, अशोक खापरे, सुनील कुटे, यादवराव सानप, सीताराम कुटे, बबन डोंबे, महादेव डोंबे यांच्यासह ग्रामस्थांनी केलेली आहे. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांची चौकशी करा
पीक नुकसानीची चुकीची माहिती देणाऱ्या संबंधित कृषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी कुपट्याचे माजी सरपंच गोपीनाथराव सोळंके यांनी केली आहे.
दोन ते तीन वर्षापासून शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे.मार्च व फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पीक हातचे गेले होते.

Web Title: The last greetings to Mohan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.