Join us

साकीनाका येथे गोडावून आणि झोपड्यांना लागलेल्या आगीत मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 11:59 IST

fire at Sakinaka : आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.

मुंबई - कुर्ला पश्चिममधील साकीनाका परिसरात आज सकाळी एका गोडावूनला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. सर्वोदय हॉटेलजवळील खादी नं. ३ येथील गोडावूनला ही आग लागली होती. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. या आगीत कुणीही जखमी झाले नाही. मात्र गोडावून जळाल्याने तसेच काही झोपड्या जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. 

 

टॅग्स :मुंबई