Join us  

भाषा युतीची, तयारी स्वबळाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:37 AM

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी घेतला आढावा

मुंबई : शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी असल्याची भाषा भाजपा नेते करत असले तरी स्वबळावर निवडणूक जिंकण्याचा आराखडा भाजपाने तयार केला आहे. अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबई दौऱ्यात प्रदेश पदाधिकारी व विस्तारकांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनय सहस्रबुद्धे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक कामांचा आराखडा तयार करण्यात आला. निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करतानाच मित्रपक्ष सोबत आले तर उत्तमच, पण नाही आले तरी सारखेच मन लावून काम करा.पक्षाची ताकद वाढविण्यासाठी दिलेली जबाबदारी चोख पार पाडा, अशा सूचना देतानाच आपण दोन महिन्यांनी पुन्हा येऊ, असे ते म्हणाले. मतदारसंघातील प्रत्येक बूथवर २५ कार्यकर्त्यांची टीम तयार ठेवावी, २५ आॅगस्टपर्यंत सर्व बूथवरील कमिट्या तयार कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक प्रभारी व चार मतदारसंघांसाठी मुख्य प्रभारी नेमण्यात येणार आहे. आमदार व प्रदेश स्तरावरील प्रमुख पदाधिकाºयांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली जाईल. आमदारांना शेजारच्या मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. भाजपाचा उमेदवार निवडून यावा यासाठी संबंधित मतदारसंघांत काम करावे व यापुढे मुख्यमंत्र्यांनी नियमित आढावा घ्यावा, असे शहा यांनी सांगितल्याचे कळते.

टॅग्स :अमित शाहशिवसेनाभाजपा