पाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक

By Admin | Updated: March 9, 2015 22:39 IST2015-03-09T22:39:39+5:302015-03-09T22:39:39+5:30

पेण वाशी खारेपाटातील धरमतर खाडी टोकावर वसलेले मोठेभाल, विठ्ठलवाडी गावाला गेल्या वीस वर्षांपासून पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागत

Landless aggressor against water scarcity | पाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक

पाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक

पेण : पेण वाशी खारेपाटातील धरमतर खाडी टोकावर वसलेले मोठेभाल, विठ्ठलवाडी गावाला गेल्या वीस वर्षांपासून पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. संतप्त महिला व गावकऱ्यांनी सोमवारी मोठ्या संख्येने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला आणि उपोषणास बसले. नळ पाणीपुरवठा योजनेतून या गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे टँकरद्वारे चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र तो अपुरा पडत असल्याचे गामस्थांचे म्हणणे आहे. ४५० ते ५०० कुटुंबे व ५००० लोकसंख्येला पाणी मिळवण्यासाठी खाजगी वाहनातून पैसे मोजून विकत पाणी आणावे लागते. राजकीय अनास्थेपोटी हा प्रश्न गेली दोन दशके प्रलंबित आहे. म्हणून संतप्त महिला व गावकऱ्यांनी मोर्चा काढून प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

Web Title: Landless aggressor against water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.