नवी मुंबईत भूमाफिया सुसाट

By Admin | Updated: May 28, 2014 01:09 IST2014-05-28T01:09:51+5:302014-05-28T01:09:51+5:30

अनधिकृत बांधकाम झाल्यास त्यास स्थानिक नगरसेवक, महापालिकेचा स्थानिक विभाग अधिकारी अन् स्थानिक पोलीस ठाण्याचा वरिष्ठ निरीक्षक जबाबदार राहील,

Land Acquisition in Navi Mumbai | नवी मुंबईत भूमाफिया सुसाट

नवी मुंबईत भूमाफिया सुसाट

नारायण जाधव, ठाणे - अनधिकृत बांधकाम झाल्यास त्यास स्थानिक नगरसेवक, महापालिकेचा स्थानिक विभाग अधिकारी अन् स्थानिक पोलीस ठाण्याचा वरिष्ठ निरीक्षक जबाबदार राहील, या शासनाच्या आदेशाला खाडीत बुडवून नवी मुंबईतल्या दिघा परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे़ दिवसागणिक नव‘नवीन’ अनधिकृत बांधकामांचे ‘गवत’ वाढण्यामागे महापालिकेतील सत्ताधारी जबाबदार असल्याचा सूर स्थानिकांत उमटू लागला आहे़ दिघा भागात फेरफटका मारल्यास ठाणे-बेलापूर महामार्गालगतच नव्हे तर ठाणे-वाशी रेल्वे मार्गाला लागूनही अनेक इमारतींची बांधकामे सुरू आहेत़ मागे ‘लोकमत’ने एका इमारतीच्या बांधकामाची तक्रार केल्यानंतर ती तोडण्यात आली़ परंतु आचारसंहितेच्या एका महिन्याच्या काळात त्याठिकाणी तळमजला अधिक तीन मजल्याची इमारत (छायाचित्र दिघा) उभारून त्याठिकाणी राहण्यास काही कुटुंबेदेखील आली आहे़ तिच्याच शेजारी आणखी एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे़ (छायाचित्र क्रमांक १) आाचारसंहिता काळात ते थांबवण्यात आले होते़ परंतु आता पुन्हा सुरू झाले आहे़ अशाचप्रकारे तेथून जवळच आणखी एका सहा ते सात मजल्याच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे, (छायाचित्र क्रमांक २) त्याठिकाणी काही कुटुंबेदेखील राहण्यास आली आहे़ तर तेथून पुढे गेल्यास महामार्गापासून तथा विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर दुसर्‍या एका इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ (छायाचित्र क्रमांक ३) २००५ रोजी या नाल्यास पूर आल्याने परिसरातील शेकडो झोपड्या पाण्याखाली गेल्या होत्या़ परंतु आता तर टोलजंग इमारती उभ्या राहू राहत आहे़ पण नवी मुंबई महापालिका, सिडको आणि पोलिसांनी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे़ अनधिकृत बांधकाम झाल्यास त्यास स्थानिक नगरसेवक, पालिका विभाग अधिकारी आणि पोलीस अधिकारी जबाबदार राहील, असा आदेश शासनाने २००९ रोजी काढला.

Web Title: Land Acquisition in Navi Mumbai