दीपोत्सवाचा सर्वत्र लखलखाट!
By Admin | Updated: October 23, 2014 00:13 IST2014-10-23T00:13:05+5:302014-10-23T00:13:05+5:30
दिव्यांची रोषणाई घेऊन आलेल्या दीपोत्सवाने मुंबईकर चाकरमान्यांच्या दहा बाय दहाच्या घरांत लखलखता प्रकाश तेजविला

दीपोत्सवाचा सर्वत्र लखलखाट!
मुंबई : दिव्यांची रोषणाई घेऊन आलेल्या दीपोत्सवाने मुंबईकर चाकरमान्यांच्या दहा बाय दहाच्या घरांत लखलखता प्रकाश तेजविला. दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या झोपड्यांपर्यंत पोहचलेल्या या दीपोत्सवाच्या तेजोमय रोषणाईने वेगाने धावणारी मुंबापुरी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झळाळून निघाली.
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि सत्तेसाठीचा सारीपाट सुरु झाला. या साऱ्या दगदगीतून बाहेर पडलेल्या चाकरमान्याने लालबाग, दादर, घाटकोपर, मुलुंड, अंधेरी
आणि बोरीवलीसारख्या बाजारपेठांतून मुंबईकरांनी लाखमोलाची खरेदी केली. फराळापासून फटाके आणि नव्या वस्त्रांसहित आभूषणांचा यामध्ये समावेश होता. मंगळवार सायंकाळसह बुधवारी सकाळी या बाजारपेठांत पाय ठेवण्यासदेखील जागा नव्हती; एवढी गर्दी येथे उसळली होती. (प्रतिनिधी)