रस्त्यावरून दुकाची, कार सुसाट वेगाने पळवून स्टंटबाजी करणाऱ्या मंडळींची आपल्याकडे कमतरता नाही. दरम्यान, मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर टेस्ट ड्राईव्हदरम्यान, एक लॅम्बॉर्गिनी कार तब्बल २५२ किमी प्रतितास वेगाने पळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी कारवाई करत ही लॅम्बॉर्गिनी कार जप्त केली आहे. तसेच रस्त्यावरील स्टंटबाजी कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश पोलिसांनी यामधून दिला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही लॅम्बॉर्गिनी कार एचआर ७०, एफ १९४५ या क्रमांकाची असून, एका सोशल मीडिया अकाऊंटवरून या कारचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक तपास केल्यानंतर ही कार सूरत येथील असून, त्या कारचा मालक नीरव पटेल असल्याचे समोर आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार डिलर फैज अडेनवाला ही कार चालवत होता. तसेच कारचा कमाल वेग दाखवण्यासाठी त्याने ही टेस्ट ड्राईव्ह केली होती.
आता या गाडीच्या सर्व कागदपत्रांची तापसणी केली जात आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास केला जात आहे. वरळी पोलिसांनी वाहन कायद्यातील कलम १८३ आणि कलम १८४ सह भादंवि कलम २८१ अन्वये एफआयआर दाखल केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : A Lamborghini was caught speeding at 252 kmph on the Bandra-Worli Sea Link during a test drive. Mumbai Police seized the car and filed a case against the driver, identified as a car dealer from Surat, for reckless driving and endangering public safety.
Web Summary : बांद्रा-वर्ली सी लिंक पर एक लैम्बोर्गिनी 252 किमी प्रति घंटे की रफ्तार से दौड़ती हुई पकड़ी गई। मुंबई पुलिस ने कार को जब्त कर लिया और सूरत के एक कार डीलर के खिलाफ लापरवाही से गाड़ी चलाने और सार्वजनिक सुरक्षा को खतरे में डालने का मामला दर्ज किया।