जोगेश्वरीत शाळेच्या लँबची भिंत कोसळली; जीवितहानी नाही
By मनोहर कुंभेजकर | Updated: July 25, 2023 14:27 IST2023-07-25T14:27:14+5:302023-07-25T14:27:56+5:30
सुदैवाने या मध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

जोगेश्वरीत शाळेच्या लँबची भिंत कोसळली; जीवितहानी नाही
मुंबई-जोगेश्वरी ( पूर्व )मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रेम नगर मच्छी मार्केट परिसरातील पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कूल मधील सकाळी पावणे सातच्या सुमारास लॅबची भिंत कोसळली.मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी घडली नाही.भिंत कोसळलेली रूम बंद असल्यामुळे व वापरात नसल्यामुळे तेथे सुदैवाने कुठलीही जीवित हानी दुर्दैवी घटना घडली नाही.
घडलेली घटना कळताच येथील महिला कार्यकर्ता सिंथीया कोरिया संवाद साधला ती धावत घटनास्थळी पोहोचली. आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या मध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या हायस्कुलमधील कोसळलेला भाग हा वापरण्यात येत नसल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी सांगितले.