लालपरी मालामाल! अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून एसटीने कमविले १४४४ कोटी रुपये

By सचिन लुंगसे | Published: March 27, 2024 06:23 PM2024-03-27T18:23:27+5:302024-03-27T18:23:36+5:30

देशाचा स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा केला जात असतानाच वयाची ७५ वर्षे पुर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना जाहीर करण्यात आली होती. एसटीने ही योजना २६ ऑगस्ट २०२२ पासून अंमलात आणली.

Lalpari goods! ST earned Rs.1444 crore from Amrut Jyeshtha Citizen Yojana | लालपरी मालामाल! अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून एसटीने कमविले १४४४ कोटी रुपये

लालपरी मालामाल! अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून एसटीने कमविले १४४४ कोटी रुपये

मुंबई : गेल्या अठरा महिन्यांत २८ कोटी १० लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेतला असून,  या प्रवासाची प्रतिपुर्ती रक्कम म्हणून शासनाने १ हजार ४४४ कोटी ५३ लाख रुपये एसटीला अदा केले आहेत.

देशाचा स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा केला जात असतानाच वयाची ७५ वर्षे पुर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना जाहीर करण्यात आली होती. एसटीने ही योजना २६ ऑगस्ट २०२२ पासून अंमलात आणली. याद्वारे गेल्या अठरा महिन्यांत या योजनेच्या माध्यमातून २८ कोटी १० लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीने राज्यभरात प्रवास केला आहे.

आठवडा बाजाराला जाण्यासाठी, नातेवाईकांना भेटण्यासाठी, औषध उपचारासाठी परवागी जाण्याकरिता, देवदर्शनाला वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खुप चांगल्या पध्दतीने एसटी बसचा ज्येष्ठ नागरिकांना उपयोग होत आहे, असा विश्वास एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या प्रवासावर व्यक्त केला आहे.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना / किती ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला

१) २२ ते ३१ ऑगस्टदरम्यान ३ लाख ८१ हजार ४७ ज्येष्ठ नागरिकांनी एसटीने प्रवास केला. याद्वारे एसटीला १ कोटी ८६ लाख ५९ हजार ६०४ रुपये मिळाले.
२) सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत ७ कोटी ८३ लाख ११ हजार ७८५ ज्येष्ठ नागरिकांनी एसटीने प्रवास केला.
३) एप्रिल २०२३ ते फेब्रूवारी २०२४ या काळात एसटीने २० कोटी २७ लाख ४ हजार ३२१ ज्येष्ठ नागरिकांनी एसटीने प्रवास केला.
४) संपुर्ण कार्यकाळात २८ कोटी १० लाख १६ हजार १०६ ज्येष्ठ नागरिकांनी एसटीने प्रवास केला.

Web Title: Lalpari goods! ST earned Rs.1444 crore from Amrut Jyeshtha Citizen Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.