लालूप्रसाद यादव पुन्हा ‘एशियन हार्ट’मध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:10 AM2018-06-21T05:10:55+5:302018-06-21T05:10:55+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना मंगळवारी सायंकाळी पुन्हा वांद्रे येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले.

Laloo Prasad Yadav again in 'Asian Heart' | लालूप्रसाद यादव पुन्हा ‘एशियन हार्ट’मध्ये दाखल

लालूप्रसाद यादव पुन्हा ‘एशियन हार्ट’मध्ये दाखल

Next

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना मंगळवारी सायंकाळी पुन्हा वांद्रे येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना मंगळवारी साडे पाचच्या सुमारास दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.
त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. यापूर्वीही, २२ मे
रोजी यादव यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सध्या रुग्णालयात त्यांच्यासोबत त्यांची मोठी मुलगी मिसा भारती आणि मोठा मुलगा तेजप्रतापही आहेत. त्यांना मूत्रपिंड आणि हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांची विशेष देखभाल घेण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title: Laloo Prasad Yadav again in 'Asian Heart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.