लक्ष्मीदर्शनाचा कहर
By Admin | Updated: October 14, 2014 00:42 IST2014-10-14T00:42:01+5:302014-10-14T00:42:01+5:30
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ठाणो जिल्ह्यातून 96 लाख 25 हजार 72क् रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

लक्ष्मीदर्शनाचा कहर
निवडणूक काळात 96 लाख जप्त : सर्वाधिक प्रमाण कोपरी-पाचपाखाडीत
ठाणो : विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ठाणो जिल्ह्यातून 96 लाख 25 हजार 72क् रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. ठाणो शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 69 लाख 85 हजार 92क्, तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत 26 लाख 39 हजार 8क्क् रुपयांची रोकड कारवाईदरम्यान सापडली. मात्र,
ठाणो ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रत रोकड जप्तीचा नारळ फुटलेलाच नाही.
सर्वाधिक 48 लाखांची रोकड कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून जप्त करण्यात आली आहे.
ठाणो जिल्ह्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहितेचा भंग घेऊ नये, यासाठी आचारसंहिता भरारी पथके तैनात करण्यात आली़ आचारसंहिता लागू झाल्यावर प्रामुख्याने पैसेवाटप किंवा मतदारांवर प्रभाव पाडणा:यांवर नजर ठेवण्यात आली.
जिल्ह्यातील 18 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघातून या भरारी पथकाने 96 लाख 25 हजार 72क् रुपयांची रोकड जप्त केली आहे. यामध्ये पहिली कारवाई ऐरोली मतदारसंघात करण्यात आली. तिथून 21 लाख 32 हजार 8क्क् रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर, कोपरी-पाचपाखाडीतून 48 लाख 29 हजार 92क् रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई सप्टेंबर महिन्यात करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये भिवंडी पूर्व येथून 1 लाख 87 हजारांची, बेलापूर मतदारसंघातून 5 लाख 7 हजारांची आणि कल्याण (ग्रामीण) मतदारसंघातून 19 लाख 69 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात
आली. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात निवडणूक काळात आचारसंहिता भंगाचे 35 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 28 गुन्हे ठाणो शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांत नोंदविण्यात आले आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी किंवा बॅनर लावण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणो बंधनकारक आहे. परवानगी न घेता सभा, पोस्टर व ङोंडे लावणो, सरकारी कामात अडथळा आणणो या प्रकारांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात. हे गुन्हे जिल्ह्यात नौपाडा, मुंब्रा, कोपरीत दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील 18 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघांतून या भरारी पथकाने 96 लाख 25 हजार 72क् रुपयांची रोकड जप्त केली आहे. यामध्ये पहिली कारवाई ऐरोली मतदारसंघात करण्यात आली. तिथून 21 लाख 32 हजार 8क्क् रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर, कोपरी-पाचपाखाडीतून 48 लाख 29 हजार 92क् रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या कारवाया सप्टेंबरमध्ये केल्या गेल्या.