Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालकाचा विश्वासघात करून नोकराने घातला लाखोंचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 20:14 IST

व्ही.पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई - दुकान मालकाचा विश्वासघात करून नोकराने १३ लाखांहून अधिक रक्कम लंपास केल्याची घटना व्ही.पी. रोड येथे सोमवारी घडल्याचे उघडकीस आले. व्ही. पी. रोड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

अंधेरी पश्चिम येथे राहणारे मुकेश कोठारी (वय - ४८) यांचे व्ही. पी. रोड येथे दुकान आहे. ७ जुलै रोजी कोठारी यांनी त्यांच्या दुकानातील नोकराला कपाटात ७ लाख २८ हजार ५०० रुपये कपाटात ठेवण्यास सांगितले होते. कपाटात अगोदरच  ६ लाखांची रक्कम ठेवलेली होती. मात्र, सोमवारी कोठारी यांनी कपाटातील रक्कम काढण्यासाठी कपाट उघडले असता कपाटात रक्कम आढळून आली नाही. त्यांनी नोकराचा शोध घेतला असता तो देखील बेपत्ता झाल्याचे उघड झाले. त्यामुळे कोठारी यांनी या प्रकरणी व्ही.पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

टॅग्स :मुंबईदरोडा