एक लाखाचा ऐवज लंपास
By Admin | Updated: October 23, 2014 23:46 IST2014-10-23T23:46:59+5:302014-10-23T23:46:59+5:30
वागळे इस्टेट अंबिकानगर क्र. दोन येथील दशरथ भगत यांच्या घरातून १ लाख १२ हजार पाचशेंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे

एक लाखाचा ऐवज लंपास
ठाणे - वागळे इस्टेट अंबिकानगर क्र. दोन येथील दशरथ भगत यांच्या घरातून १ लाख १२ हजार पाचशेंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. १८ आॅक्टोबरच्या रात्री भगत कुटूंबिय झोपी गेल्यानंतर चोरट्यांनी आपला कार्यभाग साधला. घरातील एक लाखांचे दागिने, चार हजारांची चांदीची साखळी आणि आठ हजार पाचशेची रोकड असा एक लाख १२ हजार पाचशेचा ऐवज लंपास केला आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ च्या सुमारास चोरी झाल्याचे भगत यांच्या निदर्शनास आले. वागळे इस्टेट पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत. (वार्ताहर)