Lakes now require only 40 per cent water storage | तलावांमध्ये आता केवळ ४० टक्के जलसाठ्याची गरज

तलावांमध्ये आता केवळ ४० टक्के जलसाठ्याची गरज

मुंबई : मुसळधार पावसाने ऑगस्ट महिन्यात चांगलाच जोर धरला आहे. त्यात तलाव क्षेत्रातही पाऊस सतत बरसत असल्यामुळे आता ६० टक्के जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्याकरिता आणखीन ४० टक्के जलसाठा जमा होणे आवश्यक आहे.

मुंबईत दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी तलावांमध्ये जुलै महिन्याच्या अखेरीस जेमतेम ३४ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे ५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाऊस जोरदार बसू लागला आहे. तलाव क्षेत्रातही पावसाची हजेरी असल्यामुळे दररोज ३० ते ४० हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढत आहे.

गेल्या २४ तासांत ६७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रात १३ ऑगस्ट रोजी तब्बल आठ लाख ७० हजार ८४२ दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. मार्च २०२१ पर्यंत हा जलसाठा मुंबईकरांची तहान भागवू शकेल. मात्र मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित
आहे.

जलसाठ्याची आकडेवारी( मीटर्समध्ये )
तलाव कमाल किमान उपायुक्त साठा सध्या
(दशलक्ष)
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ९०६४२ १५८.४१
तानसा १२८.६३ ११८.८७ ८८६७४ १२५.४८
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.४४
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.३४
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ९७१४१ ५९९.२४
भातसा १४२.०७ १०४.९० ४३५५८३ १३०.७४
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १२३०५८ २७२.४३

मुंबईत दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी तलावांमध्ये जुलैच्या अखेरीस जेमतेम ३४ टक्के जलसाठा शिल्लक होता.

१३ आॅगस्ट रोजी तलावांमध्ये जलसाठा
वष जलसाठा टक्के
(दशलक्ष ल्ीाटर)
२०२० - ८७०८४२ ६०.१७
२०१९ - १३३७०७७ ९२.३८
२०१८- १२७७३७३ ८८.२६

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lakes now require only 40 per cent water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.