लाखाचे ब्रेसलेट केले परत
By Admin | Updated: November 21, 2014 23:30 IST2014-11-21T23:30:24+5:302014-11-21T23:30:24+5:30
हल्लीच्या युगात प्रामाणिकपणाला किंमत नाही असे म्हणतात, मात्र प्रामाणिकपणा अंगी असल्यावर जीवनात खूप काही मिळते

लाखाचे ब्रेसलेट केले परत
धाटाव : हल्लीच्या युगात प्रामाणिकपणाला किंमत नाही असे म्हणतात, मात्र प्रामाणिकपणा अंगी असल्यावर जीवनात खूप काही मिळते, हेही तेवढेच खरे. प्रामाणिकपणाचा अनुभव रोहेकरांना ज्ञानेश्वरच्या रूपाने नुकताच आला. रोहा तालुक्यातील देवकान्हे गावच्या ज्ञानेश्वर भोईर (२३) या तरूणाने त्याला सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट परत केल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
ज्ञानेश्वर एक व्यावसायिक असून आपले दुकान बंद करुन रात्री ९.३० च्या दरम्यान पालदाड पुलावरुन जात असताना त्याला सोन्याचे ब्रेसलेट सापडले. घरी आल्यानंतर उडदवणे या गावी कबड्डीचे सामने पहाण्यासाठी आलेल्या (रेवोली) मेढा येथील राजेंद्र दिनेश काशिद या युवकाचे सोन्याचे ९० हजार रुपये किंमतीचे ब्रेसलेट हरविल्याची चर्चा त्याच्या कानावर गेली. त्याने तरुणांशी संपर्क करून ते ब्रेसलेट त्याला परत केले. (वार्ताहर)