सायन - पनवेल महामार्गावर गतिरोधकांचा अभाव
By Admin | Updated: October 27, 2014 22:30 IST2014-10-27T22:30:54+5:302014-10-27T22:30:54+5:30
सायन - पनवेल महामार्गावर कळंबोलीनजीक अनेक ठिकाणी गतिरोधकाचा अभाव असल्याने पादचा:यांना आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे,

सायन - पनवेल महामार्गावर गतिरोधकांचा अभाव
तळोजा : सायन - पनवेल महामार्गावर कळंबोलीनजीक अनेक ठिकाणी गतिरोधकाचा अभाव असल्याने पादचा:यांना आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे, मात्र संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे समजते.
काही कोटी खर्च करून बांधलेला सायन - पनवेल महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, मात्र जलद वाहतुकीबरोबर जलद मृत्यूची व्यवस्था देखील प्रशासनाने केल्याचे दिसते. कळंबोली एमजीएम, कळंबोली शाखा, कामोठे, कोपरा, खारघर या नेहमीच रहदारी असलेल्या ठिकाणी एकही गतिरोधक नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत. कळंबोली परिसरात असलेल्या शालेय विद्यार्थी, कामगारवर्ग या मार्गावरून रस्ता ओलांडताना दिसत आहेत.
यासंदर्भात पीडब्लूडीचे रमेश अगवने यांच्यासोबत संपर्क साधला असता होवू शकला नाही. (वार्ताहर)
4महामार्गावर वेगमर्यादा फलक झाले दिसेनासे
4अवजड वाहने, हलकी वाहने यांच्यासाठी दिशादर्शक फलक नाहीत
4गतिरोधकाचा अभाव
4वेग आवरण्यासाठी रंबलर नाहीत.
4कामोठा येथील अपु:या रस्त्याचे काम रखडले.
12क्क् कोटी खर्च
साधारण 12क्क् कोटी रुपये खर्चून या मार्गावरील जलद प्रवासासाठी वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी गतिरोधकांअभावी नागरिकांत नाराजी आहे. गतिरोधकाअभावी याठिकाणी वारंवार अपघातस्थिती उद्भवत असल्याचे नागरिकांचे म्हणणो आहे.