औद्योगिक सुरक्षा जागृतीचा अभाव
By Admin | Updated: November 1, 2014 22:31 IST2014-11-01T22:31:23+5:302014-11-01T22:31:23+5:30
मुंबई शहरात उद्योगांची गर्दी होऊन वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्यांत वाढ झाल्याने मुंबईला खेटूनच असलेल्या रायगड जिल्ह्यात हे कारखाने स्थलांतरित करण्यात आले.

औद्योगिक सुरक्षा जागृतीचा अभाव
जयंत धुळप - अलिबाग
मुंबई शहरात उद्योगांची गर्दी होऊन वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्यांत वाढ झाल्याने मुंबईला खेटूनच असलेल्या रायगड जिल्ह्यात हे कारखाने स्थलांतरित करण्यात आले. परंतु हे कारखाने रायगड जिल्ह्यात विकसित केलेल्या तळोजा, उरण-पनवेल, पाताळगंगा, खोपोली-पेण-सुधागड, नागोठणो-उसर-साळाव-थऴ, रोहा आणि माणगांव-दिघी-महाड या सात रासायनिक औद्योगिक क्षेत्रंत कार्यान्वित झाल्यावर जिल्ह्यातील पर्यावरणीय समस्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालीच, शिवाय औद्यागिक सुरक्षेबाबतही जागरूकता निर्माण झाली नाही. 2 नोव्हेंबर या औद्योगिक सुरक्षा दिनाच्या निमित्ताने रायगडच्या औद्यागिक सुरक्षेचा वेध घेतला असता चिंताजनक वास्तव समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यात सद्य:स्थितीत 1 हजार 531 नोंदणीकृत कारखाने आहेत. त्यांतील सर्वाधिक म्हणजे 457 कारखाने रासायनिक कारखाने आहेत़ त्यांतील 56 अतिधोकादायक कारखाने असून यामध्ये क्लोरिन, ब्रोमीन, अमोनिया, इथाइल अॅाक्साइड, ओलियम व द्रवरूप पेट्रोलीयन या धोकादायक रसायनांची हाताळणी केली जाते. धोकादायक रसायनांचा मोठा साठा असणारे 2क् कारखाने जिल्ह्यात आहेत. तब्बल 13क् किमी अंतराच्या गॅस पाइपलाइनचे भूमिगत जाळे रायगड जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यातील या एकूण कारखान्यांपैकी गेल, हिंदुस्तान पेट्रोलियम, आरसीएफ, रिलायन्स, जेएसडब्लू इस्पात, लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल्स या निवडक कारखान्यांव्यतिरिक्त कोणत्याही कारखान्यांचे ‘सेफ्टी ऑडिट रिपोर्ट’ जिल्हा प्रशासनास गेल्या अनेक वर्षापासून सादर केले जात नाहीत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रंकडून मिळाली. अत्यंत धोकादायक अशा 13क् किमी अंतराच्या गॅस, डिङोल, पेट्रोल, केरोसिनवाहू भूमिगत वाहिन्यांवर अनेक गळत्या आणि धोकादायक रसायनांच्या या वाहिन्यांतून चो:या होत असल्याचे प्रकार अनेकदा घडून, त्याबाबत पोलिसांत गुन्हे दाखल होऊनही या भूमिगत वाहिन्यांचे सेफ्टी ऑडिट करण्यात येत नसल्याने धोका प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये उपाययोजनांचा समावेश करता येत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठ वर्षात 4क् आगी,
8 स्फोट तर 8 गळतीच्या घटना
42क्क्6 ते 2क्13 या आठ वर्षाच्या कालखंडात जिल्ह्यातील 4क् कारखान्यांत मोठय़ा आगी लागून मोठी वित्त व मानवी हानी झाली आहे. यामध्ये सन 2क्12 या एका वर्षात 13 तर 2क्13 या एका वर्षात 2क् कारखान्यांमध्ये मोठय़ा आगी लागल्या आहेत. 2क्क्6 ते 2क्13 या आठ वर्षात आठ कारखान्यांत गंभीर स्फोट झाले, तर आठ वायू गऴतीच्या गंभीर घटना घडल्या आहेत.
दोन वर्षातील औद्योगिक आगींमध्ये
28 कामगारांचा मृत्यू
4यंदा आक्टोबर 2क्14 अखेर जिल्ह्यात आगीच्या 6 घटनांमध्ये एकूण 27 कामगार मृत्युमुखी पडले, तर 35 कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. वायू गळतींची बाधा 11 जणांना झाल्याची नोंद औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे आहे. गेल्यावर्षी कारखान्याच्या 2क् आगींत एकाचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर कोटय़वधी रुपयांची वित्तीय हानी झाली. चार कारखान्यांत झालेल्या स्फोटांमध्ये 37 कामगार जायबंदी झाले आहेत, तर चार वायू गळतीची बाधा सहा जणांना झाली.
4औद्योगिक कारखान्यांतील अपघात आणि वाहतुकीदरम्यानचे रासायनिक अपघात हे दोन अत्यंत कळीचे आणि जिल्ह्यातील विशेषत: कारखान्याभोवतीच्या गावांतील जनसामान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे शासनाच्या पटलावर आहेत़ परंतु त्या बाबतची कोणतीही ठोस यंत्रणा कार्यान्वित असल्याचे जिल्ह्यात दिसून येत नाही. कारखान्याच्या अंतर्गत ‘मॉक ड्रिल्स’ (संभाव्य अपघात प्रतिबंधीकरण उपाययोजना सराव) या होत असतात, परंतु कारखान्याबाहेरील गावांमधील जनसामान्यांमध्ये जागरूकता येण्याकरिता करणो बंधनकारक असणा:या बाह्य मॉक ड्रिल्स काही निवडक कारखाने वगळता कोणीही करीत नाही.