कामगार नेते श्याम म्हात्रेंचा काँग्रेसला रामराम!

By Admin | Updated: June 20, 2015 23:36 IST2015-06-20T23:36:04+5:302015-06-20T23:36:04+5:30

राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी नाराज झालेल्या रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या हजारो काँग्रेस समर्थकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता रायगड

Labor leader Shyam Mhatre's Congress resigns! | कामगार नेते श्याम म्हात्रेंचा काँग्रेसला रामराम!

कामगार नेते श्याम म्हात्रेंचा काँग्रेसला रामराम!

उरण : राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी नाराज झालेल्या रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या हजारो काँग्रेस समर्थकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता रायगड काँग्रेसच्या मनमानी कारभाराला कंटाळून कामगार नेते श्याम म्हात्रे, उरण राजिप सदस्य वैजनाथ ठाकूरसह जिल्ह्यातील इतर नाराज पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याची तयारी सुरू केली असल्याचा गौप्यस्फोट त्यांच्या निकटवर्तीयांनी केला.
विधानसभेच्या निवडणुकीआधी खारघर टोलप्रश्नी पक्षावर नाराज झालेल्या रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या हजारो काँग्रेस समर्थकांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. इतकेच नाही तर काँग्रेसच्या विरोधात भाजपमधून आमदारकीचे तिकीटही मिळविले आणि प्रशांत ठाकूर आमदार म्हणून निवडूनही आले.
उरण विधानसभेच्या रामशेठ यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसचे उमेदवार महेंद्र घरत चौथ्या स्थानावर फेकले गेले. काँग्रेसची २०-२५ हजार मते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे भाजपाकडे वळल्याने काँग्रेसच्या नशिबी पराभव आला. रामशेठ ठाकूर यांचे हजारो समर्थक काँग्रेसमधून बाहेर पडल्याने रायगड काँग्रेस पक्षामधील पोकळी भरून काढणे पक्षाला अद्याप तरी शक्य झाले नाही. उलट पक्षातून बाहेर पडणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढतच आहे.
काँग्रेसच्या घरवापसीच्या आवाहनाला रायगड जिल्ह्यातून तरी फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप निष्ठावंत काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच आता निष्ठावंतांना डावलण्याची, त्यांना अपमानास्पद वागणूक देण्याची नवी रणनीती अवलंबण्याचा प्रयत्न काँग्रेस रायगडच्या पदाधिकाऱ्यांनी चालविला आहे.
याचा प्रत्यय प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नुकत्याच दिलेल्या रायगड भेटीतून आला. त्यामुळे रायगड काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कामगार नेते श्याम म्हात्रे, राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसला रामराम करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Labor leader Shyam Mhatre's Congress resigns!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.