कामगार नेते कृष्णा मोकल यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:50 IST2020-03-03T05:50:42+5:302020-03-03T05:50:44+5:30

झुंजार कामगार नेते व श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष कृष्णा मोकल (७९) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.

Labor leader Krishna Mokal passes away | कामगार नेते कृष्णा मोकल यांचे निधन

कामगार नेते कृष्णा मोकल यांचे निधन

मुंबई : झुंजार कामगार नेते व श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष कृष्णा मोकल (७९) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आशा, मुलगा संदीप, सून डॉ. रिना राणी, मुलगी प्रणिता गडकरी असा परिवार आहे. श्रमिक उत्कर्ष सभेच्या वांद्रे (पूर्व) येथील कार्यालयात जाण्यासाठी ते सोमवारी सकाळी १०च्या सुमारास निघाले होते. त्याच वेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे चारकोप सेक्टर ८, राणी मोकल येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान निधन झाले. कृष्णा मोकल हे श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष होते. कामगार नेते व सभेचे सरचिटणीस विजय कांबळे यांच्या खांद्याला खांदा लावून गेली ४५ वर्षे काम करत त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न सोडविले. कामगारांचे आर्थिक हित जपण्याकडे त्यांचा नेहमीच कटाक्ष असे.

Web Title: Labor leader Krishna Mokal passes away