कुश लव रामायण गाती...
By Admin | Updated: November 27, 2014 22:35 IST2014-11-27T22:35:49+5:302014-11-27T22:35:49+5:30
गीतरामायण हे एप्रिल 1955 ते 1956 या कालावधीत शब्दवाल्मीकी ग. दि.माडगूळकर यांनी वाल्मीकी रामायणाचा आधार घेऊन रचलेले.

कुश लव रामायण गाती...
जयंत धुळप ल्ल अलिबाग
गीतरामायण हे एप्रिल 1955 ते 1956 या कालावधीत शब्दवाल्मीकी ग. दि.माडगूळकर यांनी वाल्मीकी रामायणाचा आधार घेऊन रचलेले. तर स्वरसूर्य सुधीर फडके यांनी संगीत देवून आकाशवाणीच्या पुणो केंद्रावरून पुणो आकाशवाणी केंद्रावर स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांनी प्रसारित केलेल्या मराठी सुश्रव्य भावगीतकाव्याने यंदा 6क् व्या वर्षात पदार्पण केले. आणि तेच गीतरामायण आज अलिबागेत कमळ नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांचे,
‘स्वयें श्रीराम प्रभू ऐकती कुश लव रामायण गाती...’
हे सुमधूर स्वर सभागृहातील सुमारे हजार अलिबागकरांच्या कर्णपटलावर पोहोचले आणि मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने,
‘स्वरांच्या स्वर्गामधुनी नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनीयज्ञ
मंडपीं आल्या उतरुनी संगमी, श्रोतेजन नाहती’
याची प्रचितीच उपस्थितांना आली, आणि सारा श्रोतृवृंद भारावून गेला.
सीताकांत लाड इ.स.1954 च्या काळात पुणो आकाशवाणी केंद्रावर स्टेशन डायरेक्टर होते. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करावयाचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्न गदिमा यांना सीताकांत लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मीकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली.सुधीर फडके ऊर्फबाबूजींनी भारतीय रागांवर आधारित संगीत देऊन स्वत: गीतरामायणाचे प्रथम गायन केले, असा या गीतरामायणाच्या निमिर्तीचा इतिहास श्रीधर फडके यांनी यावेळी आवजरून उपस्थितांना सांगितला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मनाला भावविभोर करणारे संगीत व हृदयामध्ये भक्तीचा ओलावा निर्माण करणारे शब्दसामथ्र्य, यामुळे जनमानसाला गीतरामायणाने जणू नादावून सोडले होते. एक प्रकारे सुसंस्कार करणा:या गीतरामायणाने तो काळ जिंकला होता. आता हे गीतरामायण आधुनिक फेसबुक, व्हॉट्सअॅपवर देखील जनमानसात रुंजी घालत आहे,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अलिबाग विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष तथा पंडितशेठ पाटील यांचा कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने श्रीधर फडके यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी कमळ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, रघुजीराजे आंग्रे, संचालक, सभासद आणि शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.