कुर्ला येथे पैशाच्या वादातून एकाने स्वत:ला पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:02 IST2020-03-03T00:02:11+5:302020-03-03T00:02:14+5:30
कुर्ला पूर्व येथील कामगारनगर परिसरात पैशांच्या वादातून एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना घडली.

कुर्ला येथे पैशाच्या वादातून एकाने स्वत:ला पेटविले
मुंबई : कुर्ला पूर्व येथील कामगारनगर परिसरात पैशांच्या वादातून एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना घडली. सुरेश माणगावकर (४९) असे त्याचे नाव असून ते ७० टक्के भाजले आहेत. त्यांना उपचाराकरिता भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात दाखल केले आहे.
कामगारनगर येथील आशा ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेसोबत सुरेश यांचा पैशांवरून वाद झाला. रविवारी साडेआठच्या सुमारास सुरेश हे आशा ब्युटी पार्लरमध्ये गेले व पार्लरमधील सर्व मुलींना बाहेर जाण्यास सांगितले.
यानंतर, सुरेश यांनी स्वत:वर रॉकेल ओतून जाळून घेतले. त्यांना त्वरित घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले, परंतु ते ७० टक्के भाजले असल्याने, त्यांना भायखळा येथील मसिना रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत पार्लरमधील सर्व सामान जळून खाक झाले असून, सुरेश यांची प्रकृती चिंताजनक आहे.