Join us  

कोविड योद्ध्यांना अखेर मिळणार रखडलेले वेतन; महापौरांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 1:15 AM

याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर गुरुवारी रात्री भायखळा येथील पेंग्विन कक्षात महापौरांनी तातडीची बैठक बोलावली होती.

मुंबई : कोरोनारूपी संकटाला तोंड देत पालिका रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये दिवसरात्र झटणाºया डॉक्टर, परिचारिका, कामगारांना अखेर त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. येत्या सोमवारपर्यंत रखडलेले संपूर्ण वेतन संबंधितांना तत्काळ देण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे वेतनापासून वंचित असलेल्या कोविड योद्ध्यांना अखेर त्यांचा हक्क मिळणार आहे.

मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर पालिका रुग्णालयांवरील ताण वाढला. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाºयांची कंत्राटी पद्धतीवर तत्काळ भरती करण्यात आली. तर केरळ राज्यातील काही डॉक्टरही आपली सेवा देण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र हे कोरोना योद्धा वेतनापासून वंचित आहेत. जोखीम पत्करून दिवस-रात्र पालिका रुग्णालयात व कोविड सेंटरमध्ये काम करणाºया वैद्यकीय कर्मचाºयांना मोबदला मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली होती.

याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर गुरुवारी रात्री भायखळा येथील पेंग्विन कक्षात महापौरांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत पालिकेचे सर्व सह आयुक्त, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, कार्यकारी आरोग्य अधिकारी तसेच लेखा विभागातील अधिकारी उपस्थित होते. या वेळी येत्या सोमवारपर्यंत सर्व संबंधित डॉक्टर, परिचारिका, कामगार मलनिस्सारण खात्यातील कामगार यांचे प्रलंबित वेतन तत्काळ अदा करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत मुंबईतील तसेच मुंबईबाहेरील सर्वच डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांचे एक किंवा दोन महिन्यांचे वेतन काही कारणाने प्रलंबित राहिले असेल तर ते तातडीने संबंधितांना अदा करण्यात येईल.- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महापालिकाजीवाची पर्वा न करता या कर्मचाºयांनी रुग्णांची सेवा केली. कोरोनारूपी संकटाचा सामना केला. मात्र वेतनासाठी त्यांना वाट बघावी लागत असेल, तर त्याहून वाईट गोष्ट नाही. दोन हजार आरोग्य सेविकांनाही वेतनापासून वंचित ठेवण्यात आले होते, याचा कामगार संघटनेने निषेध केला होता. किमान आता तरी त्यांना रखडलेले वेतन मिळेल अशी आशा आहे. - प्रकाश देवदास, अध्यक्ष, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका